Rohan manjare lost his hand in electric shock weds sejal mandelkar who stood by him video
प्रेम म्हणजे केवळ आनंदात साथ देणे नव्हे तर संकटाच्या काळात एकमेकांसोबत उभे राहणे. प्रेम नात्याला बळ देत. संकटात एक आधार बनतं, ज्यामुळे आयुष्याला एक वेगला अर्थ मिळतो. प्रेम हे परिस्थिती पाहून नाही, तर विश्वास, समर्पण आणि साथ यांच्यातून जोडले जाते. पण अलकडीच्या काळात असे प्रेम मिळणं सोप्प नाही. पण एक असे जोडपं आहे ज्याने सर्व अडचणींवर मात करत एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. हे खऱ्या प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.
रांगडाच्या पैलवान गडी आणि त्याच्या साथीदाराची ही गोष्ट आहे. या पैलवान तरुणाने वीजेच्या झटक्याने हात गमवला, पण त्याच्या प्रेससीने ही परिस्थिती पाहून त्याची साथ सोडली नाही. सात वर्षाच्या प्रेमानंतर दोघांच्या संसाराला सुरुवात झाली आहे. यादरम्यान त्यांच्या नात्यात अनेक अडचमी आल्या पण प्रियेसीने पैलवान तरुणाची साथ सोडली नाही. ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली अगदी घरच्यांनी देखील त्यांच्या प्रेमाला नकार दिला होता. मात्र तरुणीने सगळ्यांचा विरोध पत्कारुन आपल्या प्रेमाची साथ दिली.
सध्या सोशल मीडियावर वीजेच्या झटक्याने हात गेलेल्या तरुणाच्या उखाण्याचा एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या तरुणाचे नाव रोहन मांजरे आहे. त्याने सेजल मांडलेकर नावाच्या तरुणीशी ल्गन केले आहे. सेजलने रोहनची कठीण काळातही साथ सोडली नाही. त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिले आणि सप्तपदीची वचने घेतली. रोहनने आपले हात गमवल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. घरच्यांनी, मित्रांनी त्याच्या कठीण काळात साथ दिली तसेच सेजलने देखील त्याची साथ सोडली नाही. घरच्यांनी विरोध करुनही तिने रोहनसोबत उभी राहिली. दरम्यान याची गोष्ट रोहनने उखाण्यातून सांगितली आहे.
रोहनने म्हटले की, इलेक्ट्रिक शॉकमध्ये गमावले दोन्ही हात, वाईट काळ पाहून तिने कधीच सोडली नाही साथ, सात वर्षांचं प्रेम आमचं, अनेक संकटे आली, विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटावर एकत्र मात केली, अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारलं, पण तिने सर्वांचा विरोधात जाऊन माझं प्रेम स्वीकारलं, आजच्या या कलयुगात मी खरंज नशीबवान आहे, घरेच ऐकत नाही म्हणणाऱ्यांना माझी सेजल एक उदाहरण आहे. हा उखाणा ऐकताना तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सध्या याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @pai_rohan_manjare या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर भावुक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रेम असावे तर असं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने याला खरे प्रेम म्हणतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.