romance on bike turns costly to couple on noida express UP Police impose heavy fine
अलीकडे लोकांवर फिल्फी स्टाईल रोमान्सचे भूत चढले आहे. जिकडे बघावे तिकडे लोक भर रस्त्यात रोमान्स करताना, धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. यामुळे वाहतूकीच्या नियमांचेही उल्लंघन होत आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या नोएडामधून असाच प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत पोलिसांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘नोएडामध्ये रोमियो अँड ज्युलिएटचा बाईक सिक्वेलचा स्टंट’ असे कॅप्शन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी जोडप्याला भारी-भक्कम दंडही भरावा लागला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल बाईकवरुन जात आहे. प्रेयसी बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर बसली आह. तिने प्रियकराला मिठी मारली आहे. तसेच पठ्ठ्या विना हेल्मेटही गाडी चालवत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना चांगलाच भुरदंड भारावा लागला आहे. पोलिसांनी या दोघांवर ५३ हजाराचा दंड ठोठवला आहे.
हा व्हिडिओ पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Uppolice या अकाउंटवर शेअर केला आहे. यावर त्यांनी लिहिले आहे की, यावेळी क्लायमेक्सवर भारी-भक्कम चलन मिळाले, कोणतेही प्रेम गीत नाही. तसेच पोलिसांनी सुरक्षित गाडी चालवण्याचे आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरप तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कारवाईला समर्थन केले आहे.
Romeo & Juliet tried a bike sequel in Noida.🚦
This time the climax was a hefty challan, not a love song!
Ride safe, follow rules, let your love story live long.#RoadSafety pic.twitter.com/vav87Tgyd8
— UP POLICE (@Uppolice) August 22, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रश्न केला आहे की, दंड कोणी भरला, रोमियो-ज्युलिएटने की त्यांच्या आई-वडिलांनी? तर दुसऱ्या एका युजरने इतर रोमियो-ज्युलिएटने सावधना राहा, जर आई-वडिलांना दंड भरावा लागत असेल तर तुमची पोल खुलली म्हणून समजा असे म्हटले आहे. तर एका युजरने हे रोजचे झाले आहे आता, काहीही करा सुधारणार नाहीत प्रेमी युगल असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.