दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; महिलांचा जोरदार राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्..., Video viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये मेट्रोमधील भांडणांचे, रोमॅन्सचे, प्रॅक्सचे, कपल्सचे असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या दिल्लीकरांची ही मेट्रो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिलांमध्ये मोठा राडा सुरु आहे. महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडिओ आनंद लुटला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रो पूर्णपणे मोकळी दिसत आहे. यामध्ये दोन महिलां एकमेकांनी सीटवर लोळवत आहेत, एकमेकींची केस उपटत आहेत. एकमेकांना मारत आहेत. दोघींमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. भांडणाचे कारण अद्याप कळालेले नाही. मेट्रो मोकळी असल्यामुळे सीटवरुन वाद अशक्य आहे. पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने हे रोजचेचे आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने दोघी एकमेकींचा जीव घेतल्याशिवाय ऐकणार नाहीत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने दिल्ली मेट्रोमध्ये रोज मनोरंजन होते, ज्यांकडे टीव्ही नाही त्यांनी इथेच येऊन बसावे असे म्हटले आहे. तर चौथ्या एकाने या महिला भांडण करताना केस का ओढतात असा प्रश्न केला आहे. तर एकाने या भांडत का आहेत, सीटवरुन? असा प्रश्न केला आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
Kalesh between two ladies inside kaleshi Delhi Metro over seat issues pic.twitter.com/tny8m7TSIx
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 23, 2025
अलीकडे असे भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. कधी बसमध्ये, कधी मेट्रोमध्ये तर कधी भर रस्त्यात लोकांची भांडणे सुरु असतात. कोणत्या कारणावरुन आजकाल लोकांना राग येईल सांगता येत नाही. अगदी शुल्लक शुल्लक गोष्टींवरुनही लोक भांडत असतात. भांडताना लोकांना आसपासचे भान राहत नाही. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा ना या महिला एकमेकींच्या जीवावर उठल्यासारख्या भांडत आहे. कारण काय हे माहित नाही, पण नेहमीच हाणामारी करुन, वाद करण्यापेक्षा शांततेने वाद सोडवावा. पण लोक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.