Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

Elephant Viral Shoot : फोटोशूटसाठी विदेशी पर्यटकाने भारतात येऊन हत्तीचा केला छळ. पिंक सिटीत हत्तीलाच केलं गुलाबी अन् पाहून यूजर्स व्यक्त तीव्र प्रतिक्रिया. या शूटनंतर काहीवेळातच हत्तीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 02:06 PM
विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जयपूरमध्ये एका विदेशी फोटोग्राफरने हत्तीला गुलाबी रंग लावून केलेले फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले.
  • प्राणीप्रेमींनी याला प्राण्यांचा छळ म्हणत जोरदार टीका केली, जरी फोटोग्राफरने सेंद्रिय रंग वापरल्याचा दावा केला.
  • अनेक युजर्सनी AI वापरून असे फोटोशूट करता आले असते, असा मुद्दा उपस्थित केला.
भारतातील जयपूर हे ठिकाण पिंक सीटी म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक वास्तू, परंपरा आणि अनोख्या स्थापत्यकलेने भरलेले हे भारताचे प्रमुख राज्य आहे. अनेक लोक आपला शाही विवाहसोहळा करण्यासाठी किंवा येथील राजवाड्यांची सफर करण्यासाठी दूरदूरवरुन या ठिकाणाला भेट देतात. अशातच अलिकडे एका परदेशी पर्यटकाने या ठिकाणी केलेले फोटोशूट सध्या जास्तच चर्चेत आहे. या फोटोशूट एका महिली विदेशी पर्यटकाने हत्तीचा वापर करुन त्याला पूर्णपण गुलाबी रंगात न्हावून टाकलं. काही फोटोजसाठी हत्तीला असा रंग लावणं अनेक प्राणीप्रेमींना आवडलं नाही आणि त्यांनी इंटरनेटवर जोरदार टिका करण्यास सुरुवात केली. चला या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Galgotias University Viral Video : बेस्टीच्या बॉयफ्रेंडवर आला क्रश,मग काय… ‘पापा की परी’ भिडल्या; पाहा तुफान हाणामारी

काय आहे प्रकरण?

बार्सिलोनामध्ये राहणाऱ्या ज्युलिया बुरुलेवाने भारतातील जयपूर येथे केलेले आपले फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले. ज्युलिया व्यावसायाने एक फोटोग्राफर असून तिने केलेल्या या अनोख्या फोटोशूटने लगेचच लोकांचे लक्ष वेधले आणि काही वेळातच यावर लोकांच्या टिकांचा वर्षाव होऊ लागला. फोटोशूट सुंदर असले तरी यात वापरण्यात आलेल्या हत्तीला गुलाबी रंग दिल्याने यूजर्सच्या भावना दुखावल्या गेल्या. हा प्राण्यांचा छळ आहे असं म्हणत लोकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या फोटोजमध्ये आपल्याला महिला फोटोग्राफर आणि हत्ती दोघेही गुलाबी रंगाने रंगवलेले दिसून येतात. ज्युलियाने स्पष्ट केले की, तिने फक्त सेंद्रिक रंगाने हत्तीला रंगवले आहे ज्यामुळे हा रंग त्याच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे पण तरीही यूजर्सना हा प्रकल्प फारसा पसंत पडला नाही. एआय (AI) सर्व काही करू शकत असतानाही त्या मुक्या प्राण्याला त्रास देण्याची गरजंच काय असा प्रश्न आता यूजर्सद्वारे उपस्थित केला जात आहे.

“तू आतंकवादी आहेस”! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

दरम्यान हा व्हिडिओ @julia.buruleva नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही किती उथळ आहात? केवळ इन्स्टाग्रामसाठी तुम्ही एका हत्तीचा बळी घेतला. तुमचा आत्मा इतका रिकामा आणि तुमचे आयुष्य इतके पोकळ आहे का, की स्वतःच्या ‘आत्मप्रौढी’ला (Narcissism) खतपाणी घालण्यासाठी तुम्हाला एका निष्पाप जीवाचा वापर करावा लागतो? हे वाचणाऱ्या प्रत्येकासाठी: या ‘फोटोशूट’नंतर काहीच वेळात या हत्तीचा मृत्यू झाला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सेंद्रिय रंगांचा वापर केला, म्हणजे तुम्ही प्राण्याचा एका वस्तूप्रमाणे वापर केला नाही हे स्पष्ट होत नाही. हत्तींची त्वचा अत्यंत सच्छिद्र आणि अतिशय संवेदनशील असते.केवळ तुमच्या पोर्टफोलिओच्या फायद्यासाठी तासनतास मेकअपच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यास भाग न पाडता. तुम्ही हे काम ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने अगदी सहजपणे करू शकला असता.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Russian photographer jaipur elephant pink photoshoot goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Jaipur
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.