(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
सांगण्यात येत आहे की, सदर घटना २४ मार्च रोजी बनशंकरी येथे घडून आली. याचा व्हिडिओ व्हायरल झालयानंतर लोकांनी शिक्षकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही केली. चालू वर्गात जेव्हा प्रोफेसर विद्यार्थ्याला जातीवरुन दहशतवादी म्हणत होते तेव्हा एका सहविद्यार्थ्याने या दृष्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर व्हडिओला शेअर केलं. व्हिडिओमध्ये, वाणिज्य विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मुरलीधर देशपांडे एका जोरदार वादात गुंतलेले दिसत आहेत. ते अफान नावाच्या विद्यार्थ्याला ओरडताना ऐकू येतात, “तू दहशतवादी आहेस… काय खातोस? आज मी खूप शांत राहीन असं वाटलं होतं. तुला लाज वाटत नाही का? तू एक निरुपयोगी माणूस आहेस.”
वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राध्यापकाने ‘दहशतवादी’ हा शब्द किमान १३ वेळा वापरला. साक्षीदारांच्या दाव्यानुसार, त्यांनी इतरही गंभीर वक्तव्ये केली, ज्यात “इराण युद्ध तुमच्यासारख्या लोकांमुळे झाले,” आणि “ट्रम्प तुम्हाला संपवतील,” यांचा समावेश होता. या व्हिडिओवर सार्वजनिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र टीका झाल्यानंतर, पीईएस विद्यापीठाच्या कुलपतींनी व्यवस्थापनाने तात्काळ कारवाई केल्याची पुष्टी केली. निलंबनाची पुष्टी करताना, पीईएस विद्यापीठाचे कुलपती जवाहर दोरेस्वामी म्हणाले की, अशा कृत्यांबाबत संस्थेचे ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण आहे.
Muralidhar Deshpande, PES University Professor, referred to the Muslim Student Affan as a “TERRORIST” at least 13 times during a class. Sanghi Mindset has INFECTED even the Top Universities of India. pic.twitter.com/DSc0ssOKcQ — Dr Ranjan (@DocRGM_) March 28, 2026
दोरेस्वामी म्हणाले, “आम्ही प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही आमच्या तांत्रिक पथकाला सूचना दिल्या आहेत. आम्ही संबंधित प्राध्यापकाला तात्काळ निलंबित केले असून, एक शिस्तपालन समिती पुराव्यांची तपासणी करेल.” निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी विद्यापीठाने आपल्या तांत्रिक पथकाला वर्गातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डिंगची सत्यता पडताळण्याचे कामही सोपवले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






