दिन मैं भक्ती, रात मैं मस्ती! चार भिंतींआड केलं पण जगासमोर आलं... साधू-साध्वीचा रोमान्स कॅमेरात कैद; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्या मनोरंजनाचे काम करतात तर कधी आपल्याला थक्क करतात. इथे आपल्याला कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. तुमच्या कल्पनेत नसणाऱ्याही अनेक घटना तुम्हाला इथे दिसून येतील अशात एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चर्चेत आहे ज्यात एक साधू आणि साध्वी बंद खोलीमध्ये रोमान्स करताना दिसून आले आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर शेअर केला जात असून चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आपल्या देशात धार्मिक गोष्टींना फार महत्त्व दिले जाते अशात साधू किंवा साध्वी बनणं काही सोपं नसतं. तुम्हाला जर साधू-साध्वी बनायचं असेल तर यासाठी प्रथम ब्रह्मचार्य पत्कारावे लागते, ज्यानुसार तुम्ही कुणाशीही कोणतेही शारीरिक संबंध ठेवू शकत नाही तसेच कोणत्याही मोह मायेला बळी पडणार नाही. यात फक्त देवाच्या भक्तीला महत्त्व दिले जाते आणि म्हणून जगात साधू लोकांना फार मान दिला जातो. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याने सर्वांच्या पायाखालची जमीन हादरवून सोडली आहे यातील दृश्ये भीषण असून आता अनेकजण साधू-साध्वीच्या या कृत्यावर आपला संताप व्यक्त करत आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येणारी महिला ही साध्वी प्रेम बाईसा आहे. भक्ती, ज्ञान आणि सामाजिक कार्याद्वारे लाखो लोकांच्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या या साध्वीला अश्लिल व्हिडिओ सध्या संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रेम बाईसा ही एक लोकप्रिय साध्वी असून व्हिडिओमध्ये ती एका पुरुष साधूसोबत अश्लिल वर्तन करताना दिसून आली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एका बंद खोलीत ही साध्वी बेडवर लेटून झोपल्याचे दिसून येत आहे यावेळी एक महिलाही व्हिडिओत दिसते आणि पुढच्याच क्षणी एक वेगळे दृश्य दाखवले जाते ज्यात एक पुरुष साधू पोशाखात खोलीत येतो आणि बेडवर लोटलेल्या साध्वीच्या गालांना लाडाने कुरवाळू लागतो. यानंतर साध्वी उठते आणि त्याच्याजवळ जाते आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसून येतात. यावेळी साधू साध्वीला उत्साहात आपल्या मिठीत उचलताना आणि किस करतानाही दिसून येतो.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @trendy_larka_099 वाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांनाही इच्छा करत असेल की” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सगळे करतात यात चुकीचं काय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बोला जय बाबा की”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.