Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

साधुबाबांना पाहून सिंह घाबरले? जंगलातून बाहेर पडताना साधुच्या वाटेत आला सिंहांचा कळप; जंगलाच्या राजांची शान होती न्यारी, पण साधुबाबांची निडरता पडली भारी!

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 12:17 PM
यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जंगलातील वाटेत साधुबाबांसमोर अचानक सिंहांचा कळप आला, तरी ते बिनधास्त पुढे चालत राहिले.
  • साधुबाबा सिंहांच्या अगदी जवळून गेले, पण एकाही सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला नाही.
  • हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
सिंहाला जंगलााच्या राजा म्हणून ओळखलं जातं. जंगलातील मोठमोठे शिकारीही त्याला घाबरुन असतात. सिंह समोर आला की लोकांची पळताभुई एक होते. आता हे तर झालं सामान्य. इथे एका सिंहाला पाहूनच अनेकांची हवा टाईट होते तर विचार करा जर सिंहाचे संपूर्ण कळप तुमच्या समोर आले तर तुमचं काय होईल. निश्चितच आपल्याला भिती वाटेल किंवा आपण तिथून पळत स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करु. तथापि, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मात्र एक वेगळेच दृष्य दिसून आले.

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

साधू जंगलातून जात असताना त्याच्यासमोर सिंहांचा कळप आला. संपूर्ण रस्त्यावर सिंह जागोजागी उभे राहिले होते पण त्यांच्यातून जाताना साधू अजिबात घाबरला नाही. उलट सिंहांकडे दुर्लक्ष करत तो आरामात त्यांच्यासमोरुन पुढे निघून गेला. मुख्य म्हणजे तिथे उपस्थित सिंहांनी देखील यावेळी साधुवर हल्ला केला नाही जी फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शिकाऱ्याला पाहताच सिंह त्याच्यावर दुसऱ्या क्षणाला हल्ला चढवतो पण व्हिडिओत मात्र वेगळंच दृष्य दिसून आलं.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सुरुवातीला एक टेकडी दाखवली जाते. व्हिडिओला झूम करताच जंगलातील वाटेतून एक साधू पुढे जाताना दिसतो. त्याच्या आजूबाजूला असंख्य सिंह बसलेले असतात. सर्व सिंह साधुला जाताना पाहतात पण त्यातील एकही प्राणी त्याच्यावर हल्ला करत नाही. साधुही फार आरामात जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तिथून पुढे निघून जातो. तिथे उपस्थित प्रत्येक सिंह साधुला पाहत राहतो पण एकही प्राणी त्याच्यावर हल्ला करत नाही. साधुचा स्वॅग पाहून आता यूजर्स चांगलेच खुश झाले असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

घटनेचा हा व्हिडिओ @Roshan Garad नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला इंटरनेटवर चांगलेच पसंत केले जात असून याच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने व्हिडिओतील घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “यमराज सुट्टीवर आणि साधूबाबा ड्युटीवर”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जंगलाचा राजा कोण, हा प्रश्न सिंहांनाही पडला असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “सिंह म्हणाले, यांच्याशी पंगा नको!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Sadhu walks through lion pride without fear viral video lions do not attack saint shocking viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Lion viral video
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral
1

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral
2

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’
3

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’
4

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.