
134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन
समोर आलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील या व्यक्तीचे नाव नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असे होते. त्यांचे वय बघता ते देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते. व्यक्तीचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण सौदी अरेबियातील दहरान अल जानौब येथे अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावर वडिलोपार्जित गावी अल रशीद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अहवालानुसार, ७,००० हून अधिक लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
Saudi Arabia’s oldest man, Nasser bin Radan Al-Rashid Al-Wada‘i, has passed away at 142. Born in 1884, he had 7 wives and a family of 134 including children and grandchildren. He last married at 110 with a 29 year old girl and wished to marry again at 130. pic.twitter.com/XdLfqS9Cxh — Baba Banaras™ (@RealBababanaras) January 15, 2026
कुटुंबाच्या मते, नासेर अल-वादाई हे फार धार्मिक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात ४० वेळा हज यात्रा केली. सांगितले जाते की, त्यांनी ११० व्या वर्षी शेवटचे लग्न केले त्यानंतर ते एका मुलीचे वडील झाले. माहितीनुसार त्यांना एकूण १३४ मुले आणि नातवंडे आहेत. त्यांनी एकूण लग्ने केली आणि त्यांची तिसरी पत्नी ३० वर्षे त्यांच्यासोबत राहिली. तिच्या मृत्यूच्या वेळी तीही ११० वर्षांची होती असे म्हटले जाते. जेव्हा ते मरण पावले तेव्हा हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सौदी अरेबियातील अनेक बदलांना जवळून पाहिले. आता जेव्हा 142 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा या बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आताच्या काळातही एक व्यक्ती इतके वर्षे जिवंत राहिला ही गोष्टी अनेकांना थक्क करून जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.