हँडल सोडला, पायवर केलं अन्...; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण भरधाव रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. पण त्याची स्कूटी चालवण्याची स्टाईल पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.सामन्यत: लोक स्कूटी चालवताना हँडल पकडून चालवतात. पण हा पठ्ठ्या स्कूटीवर फत्काल मारुन बसला आहे. या महाशयांना हँडलवरुन हात पूर्णपणे सोडून दिले आहेत. एवढेच नाही तर पालथी मांडी घालून आरामात बसला आहे. शिवाय स्कूटी वेगाने धावत आहे. पण या महाशयांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही. या घटनेचा व्हिडिओ येथून जाणाऱ्या एका कार चालकाने रेकॉर्ड केला आहे.
ओला ने लॉन्च की ड्राइवरलेस ऑटोमैटिक स्कूटी, लखनऊ वाले कहेंगे कि ये अधेड़ व्यक्ति अपनी जान के साथ दूसरों की जान भी जोखिम में डाल रहा है।
📍गोमती नगर , @lkopolicepic.twitter.com/T4s0cSSKt1 — खुरपेंच (@khurpenchh) May 18, 2026
व्हायरल होत असेला व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सवर @khurpenchh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रकार लखनऊमध्ये घडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संता व्यक्क केला आहे. एका लोकाने असे लोक स्वत:च्या जीवाशी खेळतातच, पण इतरांचाही जीव धोक्यात घालतात असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने नेटकऱ्याने आमच्या देशात नमुन्यांची कमी नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. अशा वाढत्या धोकादायक स्टंटबाजीमुळे इतर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Viral Photo: ‘दार उघड…’ पैठणीची हाफचड्डी झाली व्हायरल, ‘बांदेकर भाऊजीं’च्या फोटोसह मीम्सचा पाऊस
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






