संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की...; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सर्वजण आपापल्या नादात उभे आहेत. याच गर्दीचा फायदा घेत एक तरुण समोर असलेल्या तरुणीची छेड काढत आहे. तरुण तरुणीला नको नको ते इशारे करत आहे. तिला त्रास देत आहे. सुरुवातील या सर्व प्रकाराकडे तरुणी दुर्लक्ष करते. परंतु तरुणाचे अश्लील चाळे काही थांबत नाहीत. शेवटी तरुणी थेट तरुणाला जाब विचारते. त्याला समोर बोलावून त्याची भर गर्दीत चांगलीच खरडपट्टी काढते. मुलीचा रुद्र अवतार पाहून इतर प्रवाशांचेही लक्ष जाते. काही प्रवासी हे सगळे आश्चार्याने पाहत असतात, तर काहीजण तरुणीचे समर्थन करतात.
ट्रेन में एक लड़का बार-बार लड़की की तरफ इशारा कर रहा था
फिर लड़की ने अच्छा सबक सिखा दिया 🤣 pic.twitter.com/ChnewhDxTk — Rishu (@Rishika_35) May 13, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rishika_35 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी तरुणाच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. तर तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने, अशा रोडरोमियांनो अशीच अद्दल घडवली पाहिजे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अशी लोकांना लाथा-बुक्क्यांशिवाय समजत नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






