भल्यामोठ्या खडकात माणसाला दिसला अनोखा दरवाजा, आत जाताच रहस्य उलगडले... आतील दृश्य पाहून सर्वच थबकले; Video Viral
सोशल मिडियावर आणखीन एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक चमत्कारिक गोष्ट व्यक्तीच्या नजरेस पडली. वास्तविक व्यक्ती एका विशाल खडकाच्या जवळ पोहचला, या खडकाला जवळून पाहत असतानाच त्याला एक रहस्यमय दरवाजा खडकात दडवण्यात आल्याचे दिसून आले. या दरवाजाच्या आत नक्की काय आहे हे पाहण्यासाठी व्यक्ती आत जातो खरा पण आत त्याला जे दृश्य दिसते ते पाहून सर्वच थक्क होतात.चला यात नक्की काय दिसले ते जाणून घेऊया.
कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, व्यक्ती आपल्या बलाचा वापर करत खडकामध्ये दडवण्यात आलेला दरवाजा ओपन करताना दिसून येतो. दरवाजा खुलताच तो हळूहळू यात जातो. आश्चर्याची बाब म्हणजे, याच्या आत प्राचीन गुहांसारखे लांब बोगदे आणि अनेक अरुंद मार्ग असतात. खडकाच्या आत इतके मोठे जग असेल याचा कुणी विचारही केला नसेल. व्यक्ती जसजसा पुढे जातो, तसतसे त्याला नवीन बोगदे आणि मार्ग दिसू लागतात. हे मार्ग कुणी तयार केले आणि यामागचा हेतू काय ते अद्याप स्पष्ट झाले नाही पण हा व्हिडिओ आत यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
घटनेचा व्हिडिओ @bunker.urbex नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला व्हिडिओ २.२२ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर ३,१७,००० युजर्सने त्याला लाइक्स दिले आहेत. तसेच यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “छान रील!! छान काम, मला असे व्हिडिओज फार आवडतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरोखरच छान आहे; प्रवेशद्वार खूपच सुंदर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे ठिकाण कुठे आहे?”.
बंकर ही गुप्त ठिकाणे आहेत जी सैन्य किंवा लोकांना लपण्यासाठी जमिनीखाली बांधली जातात आणि बाहेरून ते पूर्णपणे सामान्य दिसतात. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही तर इतिहासाची झलक देखील दाखवून देतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.