(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक रंजक आणि थक्क करणारे दृश्य व्हायरल होत असते. इथे अनेक धक्कादायक घटनाही शेअर केल्या जातात. अशात नुकतीच सोशल मिडियावर एक नवीन घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात ट्रेनमध्ये प्रवाशांचे महिलेसोबत लज्जास्पद कृत्य दिसून आले. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या गर्दीच्या ट्रेनमध्ये प्रवाशांनी सीटसाठी महिलांसोबत चुकीचे वर्तन केले आणि याचेच दृश्य आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही १० सेकंदांची क्लिप उत्सवाच्या हंगामातील गोंधळाचे चित्रण करते. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन महिला बर्थवर अडकल्या आहेत आणि खालून लोक महिलांचे केस ओढत त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेन डब्यातील साधारण सर्वच पुरुष बंडखोरी करत दोन्ही महिलांवर हल्ला करत असतात जे पाहणे खरोखर फार वाईट असते. संपर्ण डब्यामध्ये गोंधळ माजलेला असतो आणि लोक जास्तीच संतापलेले दिसून येतात. आता परीस्थिती काहीही असो महिलांवर असा अमानुष हल्ला करणं चुकीच आहे आणि यावर अनेक यूजर्सने संताप देखील व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ट्रेनमध्येच महाभारत सुरू झाले आहे. बिहारच्या लोकांची अवस्था पहा.”
ये लो ट्रेन में ही महाभारत शुरू हो गया अब,, देख लीजिए बिहार के लोगों के हालात,, pic.twitter.com/LiMlFG7xE5 — Adv.Nazneen Akhtar (@NazneenAkhtar23) October 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @NazneenAkhtar23 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “घटना कुठली आहे ते स्पष्ट करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संस्कारीकडून होणारा छेडछाड दिसतोय, रेल्वे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कदाचित ते दुसऱ्याच्या सीटवर बसले असतील”. दिवाळी संपली, पण उत्सवाची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. गाड्यांमध्ये जागेसाठी होणारा संघर्ष आता सामान्य झाला आहे आणि याचेच जिवंत दृश्य व्हिडिओत दिसून आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.