स्टंटच्या नादात जीवाचा केला सौदा; गाडी वळवताच ३०० फूट खोल दरीत पडली अन् पाहून सर्वांचाच उडाला थरकाप; जीवघेणा Video Viral
सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात अनेकजण नको ते प्रकार करू पाहतात आणि आपला जीव धोक्यात घालतात मात्र आपला जीव हा इतका स्वस्त नाही हे त्यांना समजत नाही. बऱ्याचदा त्यांचे हे धोकादायक प्रकार यशस्वी होतात तर कधी अपयशीही ठरतात. अशातच आता आणखीन एक असाच व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होताना दिसून आला आहे. यात स्टंटच्या नादात व्यक्तीची कार थेट ३०० फूट खोल दरीत पडल्याचे दिसून आले. यावेळी कारमध्ये काही लोक बसलेली होती. कुणाला काही समजेल त्याआधीच कार घरंगळत खाली जाते आणि आजूबाजूच्या लोकांचा थरकाप उडू लागतो. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes : पिंट्याचा शहाणपणा की पप्पांचं कॅरेक्टर? वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसून येते की, एक व्यक्ती त्याच्या कारला रेसिंग कार समजून स्टंट करायला सुरुवात करतो. या परिस्थितीत त्याचा तोल बिघडतो आणि तो जवळच असलेल्या ३०० फूट खोल दरीत पडतो. ही घटना बुधवारची असून साताऱ्यातील पाटण तालुक्यात ती घडून आली आहे. सुदैवाने, यात तरुणाचा जीव वाचला, परंतु कार पूर्णपणे यात चिरडून गेली. व्हिडिओमध्ये आपण, कारला वळवताच ती खाली घरंगळत खोल दरीत पडल्याचे दिसून येते तर व्हिडिओत काहींचा आवाजही ऐकू येतो जे हे दृश्य पाहून मोठमोठ्याने आक्रोश करत असतात. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात असून लोक यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आपण करत असलेली मजा, आपल्या जीवावर कशी बेतू शकते हे आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही घटना सगळ्यांसाठी एक शिकवण आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या स्टंटवाल्यांसाठी कोणतीच सहानभूती नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरंच म्हणतात गाडीसोबत मस्करी नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.