Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! शिक्षक पिंट्याला सुधारण्याचा सल्ला देतात पण पिंट्या बाबांचं कारण सांगत शिक्षकांचा डाव असा उधळून लावतो की शिक्षकही चक्रावून जातात. पिंट्याचे खट्याळ जोक्स वाचायला विसरू नका.
पांचट Jokes
Follow Us:
Follow Us:
विस्तार
शिक्षक: जर मागच्या दाराने चोर आला तर तू काय करशील?
पिंट्या : … तर मी १०० ऐवजी ००१ वर फोन करेन जेणेकरून पोलिसही मागच्या दाराने येतील
शिक्षक : बेटा, जर तू खऱ्या मनाने प्रार्थना केलीस तर ती नक्कीच यशस्वी होईल.
पिंट्या : राहू द्या सर, असं खरंच झालं असत तर मी आज तुमचा जावई असतो विद्यार्थी नाही…
शिक्षक : मला सांगा ‘आय लव्ह यू’ या शब्दाचा शोध देशात लागला?
पिंट्या : चीनमध्ये
शिक्षक : ते कसं बरं?
पिंट्या : कारण त्यात सर्व चिनी गुण आहेत. कोणतीही गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. चले तो चांद तक, न चले तो शाम तक…
एका पिंटूला एका मुलाला विचारले : शाळा काय आहे?
पिंट्या : शाळा ही अशी जागा आहे जिथे आपल्या वडिलांना लुटले जाते आणि आपल्याला कुटले जाते…
शिक्षिका : जर तुला तुझं कॅरेक्टर सुधारायचं असेल तर आजपासूनच मॅडमला आई मानण्यास सुरुवात करा
पिंट्या : पण मॅडम असं करून तर माझ्या पप्पांचं कॅरॅक्टर खराब होईल…
शिक्षिका : छोटी मधमाशी आपल्याला काय देते?
पिंट्या : मध!
शिक्षिका : बारीक शेळी?
पिंट्या : दूध!
शिक्षिका : आणि जाड म्हैस?
पिंट्या : ती तर नुसता अभ्यास देते!
शिक्षक : जर तुझा Best Friend आणि Girlfriend दोघ पाण्यात वाहून जात असतील तर तू कुणाला वाचवशील?
पिंट्या : मरू दे दोघांना, मुळात ते दोघ एकत्र करत काय आहेत?
शिक्षक : ज्याला ऐकू येत नाही त्याला आपण काय म्हणतो?
पिंट्या : काहीही बोला तस पण त्याला कुठं ऐकायला येणार आहे…
शिक्षक : “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर….
पिंट्या : तुम्ही हात लावून तर दाखवा… मग बघतो मी
शिक्षक वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात…
शिक्षक : कावळा सरळ का उडतो?
पिंट्या : कारण तो विचार करतो की… उगाचच… “का-वळा”?
शिक्षक पिंट्याला : त्याने भांडी घासली आणि त्याला भांडी घासावी लागतील या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?
पिंट्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे…
Web Title: Panchat jokes clever pintya try to confused teacher read funny jokes in marathi which will make you laugh