हत्तींच्या पिल्लांचा चिखलात रंगला खेळ; रायगड वन विभागाने ड्रोनच्या मदतीने टिपले मजेदार दृश्य, VIDEO VIRAL (फोटो सौैजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावह अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स यासारखे व्हिडिओ सतत पाहायला मिळतात. तसेच प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही दिवासांपासून हत्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कुठे हत्तीणी आपल्या पिल्लाला जन्म देतानाचा व्हिडिओ, तर कुठे हत्तीच्या पिल्लाचा गोड अदांमध्ये खाऊ मागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक हत्तीच्या पिल्लांचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हत्तींची पिल्ले चिखलात खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ रायगड वन विभागाने ड्रोनच्या मदतीने टिपला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीच्या पिल्लांचे एक कळप चिखलात लोळताना, खेळताना दिसत आहे. सर्व हत्ती अगदी आनंदाने पावसाळ्याची मज्जा घेत आहे. जगंलाच्या मधोमध असलेल्या एका चिखलाच्या खड्ड्यात सर्व पिल्ले खेळत आहे. रायगड विभागाचे वन अधिकारी अरविंद पीएम यांनी दिल्ल्या माहितीनुसार, सध्या रायगड आणि धर्मगड वन विभागात 150 हत्ती आहेत. त्यांच्या हालचालींवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे. हत्ती कोणत्या तलावाचे पाणी पितात, तसेच त्यांचे वर्तन जाणून घेण्यासाठी लक्ष ठेवले जात आहे. यातीलच एक मजेशीर दृश्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#WATCH | Chhattisgarh: Raigarh Forest Department’s drone captured a herd of elephants with their calves playing in the mud in the monsoon season. Visuals from Dharamjaigarh Forest Division. (08.07.2025)
(Video Source: Chhattisgarh Forest Department) pic.twitter.com/BheMJESyxs
— ANI (@ANI) July 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ANI या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने किची गोड दिसत आहेत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने वाव अशी प्रतिक्रिया देत हार्टचा इमोजी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.