shocking viral video small child playing with snake video goes viral
सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यावर माणूस थक्क होऊन जातो. अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अंगणात खेळत आहे. या दरम्यान अचानक त्याच्यासमोर एक मोठा साप येतो. धक्कादायक बाब म्हणजे हा साप फणा काढून मुलासमोर उभा राहतो. पण त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
नेमकं काय घडलं?
सापाला पाहताच भल्या भल्यांची घाबरगुंडी उडून जाते. पण लहान मुलांच्या मनात धोक्याची कल्पान नसते. अशा वेळी त्यांना भीती न वाटणे साहजिकच आहे. यामुळे चिमुकला त्या सापसोबत खेळू लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला अंगणात खेळताना दिसत आहे. तिथेच एक गाडी देखील उभी आहे. याच वेळी एक साप तिथे येतो. साप चिमुकल्यासमोर फणा काढून उभा असतो. चिमुकला अजिबात घाबरत नाही.उलट तो सापाला हातात घेतो. त्याच्या मानेला पकडून त्याच्याशी खेळत असतो. चिमुकल्याने सापाला घट्ट धरलेले असते. साप बाळाच्या हातातून सुटताच चिमुकल्यापासून बाजूला होतो. चिमुकल्याने सापाला अगदी निर्धास्तपणे पकडलेले असते. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तर काहींनी व्हिडिओ काढणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rajibul9078 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ हजारो लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले आहे. काही लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्यावर टिका केली आहे. तर काहींनी मुलाच्या पालकांवर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘व्हिडिओ काढण्यापेक्षा मुलाला सापापासून दूर करायला पाहिजे होते असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने काय वेडेपणा आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.