दोन बायका फजिती ऐका! एका नवऱ्यासाठी भर रस्त्यातच भिडल्या महिला; एकमेकींच्या झिंज्या धरल्या अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रेमात कोणी कधी काय करेल सांगता येत नाही. कधी कोण सात समुद्रपार करुन आपल्या प्रेमासोबत आनंदी जीवन जगण्यासाठी झटत असते. कर कधी प्रेमात कोणाची फसवणूक होते. प्रेमात फसवणूक आणि गैसमज निर्माण झाल्यास काही वेळी याचे रुपांतर धक्कादायक अशा घटनांमध्ये होते. अलीकडच्या काही काळात प्रेमाच्या तर थरारक अशा घटना पाहायला मिळाल्या आहेत. कोणी प्रेमासाठी दुसऱ्याचा जीव घेत आहे, तर कोणी प्रेमासाठी लढत आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यामध्ये दोन महिला एका नवऱ्यासाठी भिडल्या आहे. महिलांनी रस्त्यावर राडा सुरु केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन महिला एका नवऱ्यासाठी भांडत आहेत. तो माझाच नवरा आहे असे ओरडत जोराजोरात महिलांचे भांडण सुरु आहे. हा वाद इतका उफळला आहे की, याचे हाणामारीत रुपांतर झाले आहे. दोन्ही महिलांनी एकमेकींच्या झिंझ्यांउपटण्यास सुरुवात केली आहे. भर रस्त्यात रागात एकमेकींचे कपडे देखील फाडले आहेत. दोघीही अक्षरश: जमिनीवर लोळथ भांडण करत आहेत. हे दृश्य पाहणाऱ्या लोकांनी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही एक ऐकायला तयार नाहीत.
हा सर्व प्रकार उत्तरप्रेदशच्या मेरठमध्ये घडला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. हे दृश्य पाहणाऱ्यांपैकीच एकाने ही घटना कॅमेरात कैद केली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अगदी पोलिस अधिकारी देखील महिलांचे भांडण थांबण्यात अपयशी ठरले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
मेरठ. इश्क, बेवफाई और विवाद की ये कहानी किसी टीवी ड्रामे से कम नहीं, लेकिन ये हकीकत है. मेरठ के ब्रह्मपुरी थाने के गेट पर उस वक्त अफरा-तफरी मच गई, जब एक पति के लिए उसकी दो बीवियां आपस में भिड़ गईं. दोनों ने एक-दूसरे के बाल पकड़कर बीच सड़क पर जमकर मारपीट की.#meerut #ViralVideos… pic.twitter.com/wkQQX6TN4A
— Lallu Ram (@lalluram_news) April 23, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @lalluram_news या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, इथे मला एक मिळेना अन् याच्यासाठी दोन भांडतायत. तर आणखी एकाने पठ्ठ्याने नशीब काढले असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.