Shocking viral video Woman jumps in front of a moving train video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाला मिळताता. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक अपघातांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सतत पाहायला मिळतात. सध्या बिहारमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेने धावत्या ट्रेन समोर उडी घेतली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “एका महिलेने अचानक हाय-स्पीड ट्रेनसमोर उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. चालकाने ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले, यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र, त्याच्या हाताला दुखापत झाली. लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहू शकता की, एक महिला ट्रेनखाली पडलेली दिसत आहे. याचवेळी तीन माणसे देखील दिसत आहेत. सगळेजण तिला समजून सागंण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्यावेळाने तिला ट्रेनखालून बाहेर काढण्यात येते. तुम्ही पाहू शकता की, महिलेच्या हाताला दुखापत झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना बिहारच्या बेगूसराय येथे घडली असल्याचे व्हिडिओच सांगण्यात आले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
तेज रफ्तार ट्रेन के आगे महिला ने अचानक लगाई ‘मौत की छलांग’। ड्राइवर ने तुरंत इमरजेंसी ब्रेक लगा दिए, जिससे महिला की जान बच गई। हालांकि उसके हाथ में चोटें आईं। लोगों की मदद से उसे अस्पताल भेजा गया।#TrainAccident #SuicideAttempt #EmergencyBrakes #WomanInjured #RailwayIncident… pic.twitter.com/g5dDLDGqC3
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) April 10, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @firstbiharnews या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी महिलेने जीव देण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न केला आहे. काही लोकांनी लोकोपायलटच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, याची एफआयआर दाखल करण्यात यावी. तर दुसऱ्या एकाने आयुष्य खूप मुश्किलीने मिळते, ते आनंदाच जगायचे सोडून लोक संपवण्याचा प्रयत्न का करतात असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.