
बॅगेतून फोन काढला अन् थेट ट्रेनमध्ये चढली! महिला चोरटीची हातचलाखी पाहून नेटकरीही थक्क, CCTV VIDEO चर्चेत
व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन दिसत आहे. ट्रेनच्या दरवाजाजवळ प्रवाशांची मोठी गर्दी असून अनेकजण ट्रेनमध्ये चढताना दिसत आहेत. याच गर्दीचा फायदा घेत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या बॅगेतून मोबाइल फोन काढल्याचे व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे. मोबाइल चोरी केल्यानंतर संबंधित महिला कोणतीही घाई किंवा संशयास्पद हालचाल न करता थेट ट्रेनमध्ये चढते. संपूर्ण प्रकार काही सेकंदांत घडतो. त्यामुळे पीडित महिलेला सुरुवातीला आपला मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षातही येत नाही.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार, पीडित महिलेच्या मागे असलेल्या दुसऱ्या महिलेने तिला मोबाइल चोरी झाल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पीडित महिला चांगलीच चक्रावून जाते. ती तातडीने आपल्या बॅगेत मोबाइल शोधू लागते. मात्र, तोपर्यंत मोबाइल घेणारी महिला ट्रेनमध्ये चढून निघून गेल्याचे दिसते.
देख कर तो सब सामान्य लग रहा था
लेकिन 1 सेकंड में ऐसा क्या हुआ के महिला हैरान रह गई
जब पीछे वाली महिला ने उसको बताया तो उसके होश उड़ गए इसलिए कहते है पब्लिक प्लेस में होशियार रहना चाहिए। https://t.co/wsSAYyM8lc — Bilal Ansari (@Bilalansari1995) November 19, 2026
हा व्हिडिओ पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींना महिलेने केलेली हातचलाखी समजून घेणे कठीण जात आहे, तर काही जण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगत आहेत. काही युजर्सनी अशा प्रकारच्या चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
रेल्वे स्टेशनवर ट्रेन येताना किंवा सुटताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा वेळी चोरट्यांना प्रवाशांचे लक्ष विचलित करून चोरी करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
– बॅग नेहमी खांद्यावर समोरच्या बाजूला ठेवावी.
– बॅगेची चेन व्यवस्थित बंद ठेवावी.
– मोबाइल फोन मागच्या खिशात किंवा सहज काढता येईल अशा ठिकाणी ठेवू नये.
– ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना आजूबाजूच्या हालचालींकडे लक्ष द्यावे.
– गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी.
रेल्वे प्रवासात काही सेकंदांची निष्काळजीपणाही महागात पडू शकते. त्यामुळे प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे.
Ans: व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या बॅगेतून मोबाइल फोन चोरी केल्याचे दिसत आहे.
Ans: पीडित महिलेच्या मागे असलेल्या दुसऱ्या महिलेने तिला चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर तिला मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
Ans: प्रवासादरम्यान बॅग नेहमी समोर ठेवावी, बॅगेची चेन बंद ठेवावी आणि मोबाइल तसेच पाकीट सुरक्षित खिशात ठेवावे.