आहे की नाही क्रीएटीव्हीटी! दुकानदाराने फोन पे मशिनलाच बनवून टाकले स्पीकर; भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडिया कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसूनहसून पोट दुखून येते. कधी डान्स रील्स, कधी स्टंट, भांडण तर कधी भन्नाट जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका व्यक्तीने असा जुगाड केला आहे की, पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील तर तुम्ही फोनवर ऐकाल किंवा स्पीकरवर. पण तुमच्याकडे छोटा स्पीकर नसेल तर फोनवरच ऐकाल. पण या व्यक्तीने चक्क फोन पे मशिनला स्पीकर बनवून त्याच्यावर गाणी लावली आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच हा जुगाड पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
फोन पे मशिनला बनवले स्पीकर
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने फोन पेच्या स्पीकरवरचा स्कॅनर कोड काढून टाकला आहे. तसेच या स्पीकरच्या बाहेरच्या बाजूने रेडिओला जशी ऑन-ऑफ, व्हॉल्यूम कमी-जास्त करण्यासाठी जशी बटणे असतात, तशा बटणांचा सेट त्याने जोडला आहे. या बटणांच्या सेटच्या मदतीने तो पाहिजे ती गाणी ‘प्ले’ करून ऐकतोय. असा जुगाड पाहून फोन पे वाले पण हैराण झाले असतील. हा जुगाड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या भारतात टॅलेंटची नक्कीच कमी नाही. हे या व्हिडिओवरून तुम्ही पाहून शकता.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dulichand_nngal या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लाईक आणि व्हयूज मिळाले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘ही क्रीएटीव्हिटी भारताबाहेर गेली नाही पाहिजे’ असे म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, फोन पे वाल्यांनी देखील असा विचार कधी केला नसेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, फोन पे वर सदाबहार गाणी प्राप्त झाली आहेत. आणखी एका युजरने हे काही नवीन नाही. यासांरख्या अनेक प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.