फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या लोकांना सोशल मीडियाचा रोग झाला आहे. लोक फेमस होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा मागे पुढे विचार करत नाही. विशेषत: तरूणांचा यामध्ये समावेश आहे. अनेकदा लोक असे काही करून बसतात की त्यांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तरूणांनी धावत्या ट्रेनसमोर व्हिडिओ काढण्याचा धाडसी, परंतु धोकादायक प्रयत्न केला.
या तरूणांनी युट्यूब व्लॉग शूट करण्यासाठी एवढे मोठे धाडस केले आणि त्यांचा जीव धोक्यात आला आहे. हा व्हिडिओ बांग्लादेशमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांच्या या कृत्याची तीव्र निंदा केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही मित्र रेल्वे ट्रकवर युट्यूब व्लॉग शूट करताना दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून ते शूट करत आहेत. काही वेळातच ट्रेन येताना दिसताच ते ट्रॅकच्या बाजूल येऊन उभे राहतात. या मित्रांना रेल्वे बाजूने जात असतानाचा व्हिडिओ शूट करायचा असतो. तेवढ्यात मागून एक ट्रेन भरधाव वेगाने येते. त्याच वेळी ही मुले बाजूला उभे राहून शूट करत असतात. एक मुलगा व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी डोकाऊन बघत असतो. तितक्यात च्या ट्रेनचा धक्का त्या मुलाला लागतो. आणि तो मुलगा खाली पडतो. या मुलाच्या अंगावरून ट्रेन गेली की नाही किंवा त्या मुलाला कोणती गंभीर दुखापत झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच इतर मुलांनाही काही झाले नाही ना याबाबत कोणती माहिती नाही.
व्हायरल व्हिडिओ
While Making Tiktok Videos A Train Hits the guy in Bangladesh
https://t.co/06kZEovLGn— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. रीलसाठी असोे कृत्य कोणीही करू नये ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे लोकांना जीवनापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे कृत्य करण्यापेक्षा सुरक्षितता महत्वाची आहे हे लोकांना समजून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.