फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट altu.faltu
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी असे व्हिडिओ समोर येतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रील्स, जुगाड, स्टंट, भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हसूनहसून लोटपोट झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एक काका पेट्रोलच्या टँकरवर ‘नो स्मोकिंग’ हा संदेश अतिशय सुंदर पद्धतीने ब्रशने लिहिताना दिसत आहेत. काकांच्या या कॅलिग्राफी कौशल्याने सर्वांना अचंबित केले आहे. मात्र असे लिहिताना त्यांनी असे काही तोंडात पकडले आहे की, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला ट्रोल केले आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की नक्की काका काय करत आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की, काका टॅंकरवर नो स्मोकिंग लिहिताना दिसत आहेत. मात्र हे लिहिताना ते सीगरेट पीत आहेत. हे कृत्य अत्यंत धोकादायक वाटत आहे. हा व्हिडिओ पाहून, लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. या कृत्यामुळे कोणतीही छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते अस लोकांचे म्हणणे आहे. मात्र व्हिडिओ पाहून असेही वाटत आहे की काका सीगरेट पीत नसून त्यांच्या तोंडात छोटा पेंट ब्रश आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @altu.faltu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओने अल्पावधीतच हजारो लोकांचे लक्ष वेधले आहे आणि त्याला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काकांचे यमराजसोबत रोज उठणे बसणे आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो पेंट ब्रश आहे सीगरेट नाही, चौध्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांचे काम ते प्रामाणिक पण करत आहे. त्यांची कॅलिग्राफी फार सुंदर असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने व्हिडिओ बनवणाऱ्याला फटकारले आहे कारण त्याने चुकीच्या ॲंगलने व्हिडिओ काढला आहे. तर अनेकांनी काकाची मजा घेतली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.