Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

Silver Ant : तुम्ही कधी चांदीच्या मुंगीविषयी ऐकले आहे का? काल्पनिक नाही हे आहे सत्य, कारण सहारा वाळवंटात या अनोख्या रंगाची मुंगी आढळली जाते. ती आपल्या प्रचंड वेगासाठी ओळखली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 03:38 PM
कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

Follow Us
Follow Us:
  • सहारा वाळवंटात आढळणारा एक अनोखा जीव आपल्या खास शरीररचनेमुळे तीव्र उष्णतेतही सहज जिवंत राहतो.
  • हा छोटासा जीव वेग, सहनशक्ती आणि वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित करतो.
  • सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनंतर अनेकांनी याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हटले आहे.
जगात असे अनेक जीव आहेत ज्यांची माहिती मानवाला नाही. सहारा वाळवंटात अशीच एक अनोखी चांदीची मुंगी आढळली जाते. होय, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटत असेल पण चांदीच्या रंगाची मुंगी वास्तवात आढळली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही मुंगी वाळवंटासारख्या सर्वात उष्ण वातावरणात आढळून येते. जेव्हा वाळवंटाचे वातावरण 70 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते तेव्हा ही मुंगी बाहेर पडून फिरु लागते. याचप्रमाणे जेव्हा थंडीचे वातावरण बनते तेव्हा ही मुंगी अचानक गायब होती.

प्रेम की वेडेपणा? ग्रॅज्यूएशनचा आनंद साजरा करत महिलेने 14 फूट मगरीसोबत केले अनोखे फोटोशूट, पाण्याच्या राक्षसाचे घेतले चुंबन

वैज्ञानिक भाषेत या मुंगीचे नाव Cataglyphis bombycina असे आहे. ही जगातील सर्वात वेगवान मुंगी मानली जाते. ती एका सेकंदात आपल्या शरीराच्या लांबीच्या १०८ पट अंतर कापू शकते. याचा अर्थ असा की, जर माणसांनी याच वेगाने प्रवास केला, तर ते ताशी ७०० किलोमीटर वेगाने धावत असतील. मुंगीची खासियत म्हणजे तिचा वेग आणि उष्ण वातावरणातही सहज जिवंत राहण्याची क्षमता.

सिल्वर एंटच्या शरीरावर चांदीच्या रंगाचे लहान केस आढळल्याचे सांगण्यात येते. हे केस त्रिकोणी आकारात असतात जे सूर्यप्रकाश आणि जवळच्या इन्फ्रारेड किरणांना अडवतात, ज्यामुळे मुंगीला जास्त गरम होण्यापासून वाचवते. यासोबत तिचे पाय इतर मुंग्याच्या तुलनेत काहीसे लांब असतात ज्यामुळे तिचे शरीर वाळूच्या संपर्कात येत नाही आणि यामुळे तिला चटके लागत नाही. ही मुंगी दिवसातून फक्त १०-१५ मिनिटे बाहेर पडते आणि यादरम्यान ती उष्णतेने वाळून मृत पावलेल्या इतर किटकांची शिकार करते. इतक्या उन्हात बाहेर निघण्याचा फायदा तिला असाही होतो की इतर मोठे प्राणी या वातावरणात बाहेर निघत नाही ज्यामुळे या मुंगीच्या जीवाला धोका नसतो.

खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral

अलिकडे सोशल मिडियावर या मुंगीचे व्हिडिओज आणि काही फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत ज्यानंतर तिचे वास्तव लोकांसमोर आले. अनेकांनी यावर आपले आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी याला निसर्गाचा चमत्कार मानले. @sci_shakti नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात क्रिएटरने चांदीच्या मुंगीची सविस्तर माहिती सांगितली. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “या मुंग्या मंगळावर जगू शकतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर मुंग्या किंवा मांजरांचा आकार मानवाएवढा असता, तर आपण अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी नसतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यावरून हे सिद्ध होते की, अगदी लहान जीवसुद्धा आपल्याला सर्वात मोठे धडे शिकवू शकतात. जगण्यासाठी आवश्यक अनुकूलन आणि बुद्धिमत्ता—हे सर्व एका चिमुकल्या वाळवंटी मुंगीमध्ये सामावलेले आहे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Silver ant who survives in extreme heat in sahara desert viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • animal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.