कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने दिला 'असा' राजीनामा; पाहून नेटकरी हादरले म्हणाले...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा अशा घटना समोर येतात की आश्चर्यचा धक्का बसतो. सध्या एक विचित्र घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेने कंपनीच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे या महिलेने चक्क टॉयलेट पेपेरवर राजीनामा लिहून दिला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतीवल वर्क कल्चरमुळे तरुणी नैराश्यामध्ये चालली होती. यामुळे तीने राजीनामा देण्याचे ठरवले. तिने राजीनाम्यात लिहले की, “मला अगदी टॉयलेट पेपरसारखी वागणूक मिळाली आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापर करुन टॉयलेट पेपर सारखे फेकून देण्यात आले आहे.” असे लिहून तिने राजीनामा दिला आहे. सध्या हा राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकदा असे होते की, लोकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर मग अशी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत नाही. मग अगदी पैसे कमी मिळाले तरी चालतील अशी त्यांची भूमिका असते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगाुपूर येथील एका महिलेने LinkedIn वर एका महिलेचा राजीनामा शेअर केला आहे. त्यानंतर ही पोस्ट सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. महिलेने म्हटले की, कंपनी ज्याप्रमाणे माझ्याशी वागली त्याच प्रमाणे मी राजीनामा दिला आहे. या महिलेचे नाव एंजेला असून तिने म्हटले आहे की, कंपन्याना सल्ला दिला आहे. तिने कंपन्यांना म्हटले आहे की कर्मचाऱ्याशी इतके चांगले वागा की, तो कंपनी सोडून जाताना आभार मानून गेला पाहिजे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पोस्ट
A resignation letter on tissue paper — that’s how one employee in Singapore chose to express how poorly they were treated.
Angela Yeo shared the incident on LinkedIn, reminding companies: respect isn’t optional. pic.twitter.com/em1dOUJ7h7
— Yamini Patel (@yamini96_) April 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेली पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @yamini96_ हीने शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकजण हादरले आहेत. अनेकांनी आपल्या विविध प्रतिक्रिया देत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आमच्या कंपनीत देखील असेच होते, माझ्यासोबत अगदी कचरा सारखे वागवले जाते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे हल्ली सगळीकडेच सुरु आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.