आकाशातील शिकाऱ्याचा पाण्याच्या राक्षसाशी सामना, गरुड-मगरीच्या या जीवघेण्या खेळात विजय कुणाचा? पाहा Viral Video
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसण्यास प्रवृत्त करतात तर काही व्हिडिओज इतके थरारक असतात की त्यांना पाहताच आपले हातपाय थरथर कापू लागतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला गरुड आणि मगरीची जीवघेणी लढत पाहायला मिळत आहे.
जंगलातील शिकारी प्राण्यांना प्रत्येकजण घाबरतो कारण त्यांच्या वेग आणि शैलीने ते त्यांचे शिकारीचे काम क्षणार्धात संपवतात. जंगलातील भक्षक प्राण्यांप्रमाणे पाण्यात राहणारा मगर हा पाण्याचा भयानक राक्षस मानला जातो, तर गरुड हा आकाशाचा धूर्त शिकारी मानला जातो. मगर आपल्या शिकारीची फार क्रूरपणे हत्या करतो. आपल्या धूर्त वृत्तीची हे दोन्ही प्राणी मुख्यतः ओळखले जातात. मात्र हे दोन्ही जीवघेणे शिकारी जेव्हा एकमेकांशी लढतात तेव्हा यात नक्की कोणचा विजय होईल? कोण कोणाला भारी पडेल? याचेच उत्तर आपल्याला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा – जीव संपवण्यासाठी गेली अन् रेल्वे रुळावरच जाऊन झोपली, तरुणीचा Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर यात दिसते की, एक तलाव आहे आणि या तलावात एक मगरदेखील आपला ठाण मांडून बसली आहे. तितक्यात तिथे एक गरुड येतो आणि तो तलावातील एका जीवाला पकडून पळण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याने ते केल्याचे पाहताच मगर त्याच्या मागे लागते आणि गरुड स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात तो जीव काठावर ठेऊन दूर उभा राहतो. मागून मगर येते आणि त्या जीवाला आपल्या जबड्यात पकडून पुन्हा तलावात जाते आणि त्याचा आस्वाद घेऊ लागते. दुरून गरुड हे सर्व निराशा नजरेने पाहत राहतो.
हेदेखील वाचा – इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक
हा व्हिडिओ @Latest Sightings नावाच्या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की व्हिडिओ गॅविन अलर्ड यांनी आफ्रिकेतील पफुरी बॉर्डर रेस्ट कॅम्पच्या दौऱ्या दरम्यान बनवला आहे.व्हिडिओमध्ये मगरीच्या तुलनेत गरुडाची हुशारी फिकी पडल्याचे दिसून येते. या व्हिडिओला 3 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” गरुड भाग्यवान आहे की तो जिवंत वाचला आहे नाहीतर नगरीचे पुढचे जेवण गरुड बनला असता.”