सापाला सर्वात धोक्कादायक प्राण्यांपैकी मानले जाते. याचे विष क्षणार्धात भल्यामोठ्या जीवालाही मृत्यूच्या विळख्यात खेचते. सापाला लांबूनच पाहताच प्राणीच काय तर माणसंही आपली वाट बदलून दुसऱ्या वाटेने चालू लागतात. याची दहशत सर्वत्र प्रचलित आहे. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की इवलासा दिसणारा साप मोठमोठ्या प्राण्यांनाही खायला मागेपुढे बघत नाही. मात्र प्रत्यक्षात तो हे कसे करतो तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला याचे उत्तर मिळेल.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवून जातात तर काही आश्चर्याचा धक्का देतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यात एक साप भल्यामोठ्या गायीला कशाप्रकारे गिळतो आणि हे करताना त्याच्या शरीरात नक्की कोणते बदल होतात ही सर्व प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक खराखुरा व्हिडिओ नसून एआयद्वारा क्रिएट केलेला एक व्हिडिओ आहे. मात्र तरीही या व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्… पाहूनच क्षणार्धासाठी श्वास थांबेल, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @devtaru_52 नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजगर मोठ्या प्राण्यांना कसे गिळतात ते पहा असे लिहिण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अजगर मोठमोठे प्राणी सहज गिळू शकतो. कारण त्याचा जबडा इतर प्राण्यांप्रमाणे हाडांनी जोडलेला नसतो. उलट त्या जागी मजबूत अशा मांसपेशी असतात. या पेशी रबरासारख्या ताणल्या जातात. त्यामुळे कितीही मोठा प्राणी असला तरी अजगर त्याला सहज गिळू शकतो. प्राणी गिळल्यानंतर अजगराच्या शरीरात रासायनिक अभिक्रिया सुरू होते. त्यामुळे काही तासांमध्ये प्राण्याचं शरीर हळहूळ विरघळू लागतं. लक्षवेधी बाब म्हणजे गिळलेल्या प्राण्याची हाडं सुद्धा विरघळून जातात. अशा प्रकारचे साप कुठल्याही प्राण्याला आपली शिकार बनवू शकतात.
हेदेखील वाचा – आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल
दरम्यान अनेकदा साप आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या प्राण्यांचा क्षणार्धात गिळून मोकळे होतात. सापाला आपल्या शिकाऱ्याला संपवायला तितकासा काही वेळ लागत नाही. याआधीही सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. असे व्हिडिओ पाहून आपल्याला सापाच्या दहशतीची प्रचिती येते. मागेदेखील एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता ज्यात सापाला पाहताच वाट बदलून पाळणारा सिंह दाखवण्यात आला होता.