नागदेवताला भोजपुरी गाणं काही आवडेना, अश्लील डान्स पाहून लाजला अन् स्वतःच बंद केला फोन; हसूच अनावर करेल हा Viral Video
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक मजेदार, थक्क करणारे आणि हादरवून टाकणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक असे दृश्यही शेअर केले जातात ज्यांची कधी आपण कल्पनाही केली नसेल. आताही काही असेच इथे व्हायरल झाले हे जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. वास्तविक, व्हिडिओमध्ये एका सापाच्या समोर फोनमध्ये एक भोजपुरी गाणं सुरु केल्याचं दिसून येत ज्याला साप फार ध्यान देऊन पाहत असतो पण जसजसा व्हिडिओ पुढे जातो त्याला गाण्यातील दृश्य काही आवडू लागत नाही आणि मग तो स्वतःच आपल्या जिभेने फोनवर सुरु असलेलं हे गाणं बंद करून टाकतो. हे दृश्य इतके मजेदार असते की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका स्टँडवर स्मार्टफोन ठेवल्याचे दिसून येते. फोनच्या स्क्रीनवर एक भोजपुरी गण वाजत असतं ज्यात नायक आणि नायिका अश्लील डान्स करत असतात. फोनच्या समोर एक साप बसलेला असतो आणि तो आपल्या डोळ्यांनी हे सर्व दृश्य निरखून बघत असतो. साप काही वेळ टकामका स्क्रीनकडे बघत राहतो आपण नंतर अचानक आपल्या जिभेने तो स्क्रीनला स्पर्श करतो आणि बॅक बटन दाबत गाणं बंद करून टाकतो. सापाचे हे कृत्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून सापाला गाणं आवडलं नसावं आणि म्हणूनच त्याने गाणं थांबवल अशा मिश्किल प्रतिक्रिया आता व्हिडिओला मिळत आहेत.
लगता है नाग बाबा को ये भोजपुरी गाना पसंद नहीं आया, तभी इसने बंद कर दिया🤣
बस यही देखना रह गया था,, pic.twitter.com/yfwiEm5IB3
— Adv.Nazneen Akhtar (@NazneenAkhtar23) August 25, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Earth_Seeker1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘असं वाटतंय की नाग बाबांना हे भोजपुरी गाणं आवडलं नाही, म्हणूनच त्यांनी ते थांबवलं, हेच पाहायचं राहिलं होतं” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला नागीण सिरीयल बघायची असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा विषारी साप आहे की साधा साप” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याला ते आवडलं पण जास्त बघवलं गेलं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.