(फोटो सौजन्य: Youtube)
जगात आई-मुलाचे नाते सर्वात घट्ट मानले जाते. आईच्या कुशीत मुलाला सुरक्षितता, माया आणि ऊब मिळते. पण कधी कधी निसर्गाच्या विचित्र खेळामुळे हे नाते तुटते आणि त्याचे परिणाम पाहून डोळे पाणावतात. असेच काहीसे एका छोट्या हत्तीच्या पिल्लाबाबत घडले. जन्मानंतर काही तासातच या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले. सहसा आई हत्ती जन्मानंतर पिल्लावर प्रचंड प्रेम, काळजी व माया दाखवते. परंतु या घटनेत आईने पिल्लाला जवळ घेण्याऐवजी त्याला दूर केले. आईकडून न मिळालेली ऊब आणि मायेची आस पिल्लाला खूप जाणवली.
आईची साथ न मिळाल्याने ते पिल्लू तासनतास रडत राहिले. त्याच्या डोळ्यातून गळणारे अश्रू पाहून वनाधिकारी व तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. छोट्या जीवाला आपल्या आईची माया हवी होती, पण ती मायेची ऊब त्याला मिळाली नाही. आईने आपल्याला स्वीकारण्यास नाकारले आहे हे जाणवताच तो रडत राहिला. हे दृश्य इतके भावुक करणारे होते की ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याचे हृदय पिळवटून निघाले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…
माहितीनुसार, ही घटना २०१३ साली एका चिनी प्राणीसंग्रहालयात घडून आली. इथे छोटंसं हत्तीचं पिल्लू जन्माला तर आलं पण मुलाच्या आयुष्यात जन्मापासूनच दुःख लिहिलेले होते. पिल्लाला पाहताच त्याच्या आईने त्याला नाकारले आणि तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जन्मदात्या आईकडूनच अशी वागणूक मिळाल्याने पिल्लाला क्षणातच अश्रू अनावर झाले. तो रडला पण किती, तर सलग पाच तास… त्याचे हे दुःख इतके हृदयद्रावक होते की याचा व्हिडिओ इतक्या वर्षांनी शेअर केल्यानंतरही व्हायरल झाला.
लोकांनी पिल्लाचे दुःख समजून घेतले आणि यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “प्राण्यांना भावना असतात याचा हा पुरावा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते पाहणे हृदयद्रावक होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला रडू आलं, मला त्या बाळाला मिठीत घ्यावंस वाटत आहे”. दरम्यान घटनेचा व्हिडिओ @NewsEDKennedy नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.