अहो आश्चर्यम्! महिला झोपली अन् तोंडातून बाहेर आले नागराज; Viral Video पाहून व्हाल भयभीत
महिलेच्या तोंडात गेला साप
अथक प्रयत्न करून डॉक्टरांनी काढला बाहेर
सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
Trending Viral Video: आपण रोज आपला दिवसभरातील काही वेळ सोशल मिडियावर देखील व्यतीत करत असतो. यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ किंवा रील्स बघायला मिळतात. ज्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्या पाहून आपण हसतो, कधी भावुक होतो तर कधी आपल्याला विचार देखील करायला लावतो. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की तुम्ही गाढ झोपेत आहे आणि तुमच्या तोंडात साप शिरला आहे. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे त्यानुसार, हा साप महिलेच्या इतक्या आतमध्ये शिरला की डॉक्टरांना काढण्यासाठी प्रचंड महेनत करावी लागली.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झोपलेल्या महिलेच्या तोंडात साप गेलेल्या दिसून येत आहे. गळ्यात साप गेला तेव्हा त्या महिलेस त्रास झाला. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्या सापाला महिलेच्या तोंडातून बाहेर काढले.
काय आहे व्हिडिओत?
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रूग्णालयात दिसून येत आहे. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. सापाला बाहेर काढण्यासाठी तिच्या तोंडात एक पाईप टाकण्यात आला आहे. महिलेय खूप त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर डॉक्टर अथक प्रयत्न करतात आणि सापाला बाहेर काढतात.
The snake reportedly entered the woman’s mouth when she was sleeping outside and slithered down her throat. https://t.co/8R6inpyH4o pic.twitter.com/k7DAAUCJv2 — Arojinle (@arojinle1) October 7, 2025
हा व्हिडिओ @arojinle1 या अकाऊंटवर पोस्ट केला गेला आहे. दरम्यान हा साप महिलेच्या तोंडात कसा गेला आणि त्या महिलेला जाणवले कसे नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे मात्र संजू शकलेले नाही.
तो आला, त्यानं पाहिलं अन् क्षणार्धात…; लॅम्बोर्गिनीची अवस्था बघून तोंडात बोटे घालाल, पहा Viral Video
लॅम्बोर्गिनीची अवस्था बघून तोंडात बोटे घालाल, पहा Viral Video
दोन बैलांनी लॅम्बोर्गिनी वाट लावली आहे. हा व्हिडिओ @KarishmaAziz_ पोस्ट करण्यात आला आहे. एक महागडी अशी लॅम्बोर्गिनी गाडी रस्त्यात उभी होती. या व्हिडिओमध्ये दोन शक्तीशाली बैल धावत आले आणि त्यांनी लॅम्बोर्गिनी गाडीचे नुकसान केले, असे दिसून येत आहे. एक बैल या गाडीवर उडी मारतो आणि या गाडीची काच, बोनेट तुटले आहे.