बैलांनी फोडली गाडीची काच (फोटो- ट्विटर)
बैलांनी फोडली लॅम्बोर्गिनी कार
सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
लॅम्बोर्गिनी कारचे अतोनात नुकसान
Bullock Damaged Lamborghini Car: आपण रोज आपला दिवसभरातील काही वेळ सोशल मिडियावर देखील व्यतीत करत असतो. यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ किंवा रील्स बघायला मिळतात. ज्यामध्ये आशा गोष्टी असतात की त्या पाहून आपण हसतो, कधी भावुक होतो तर कधी आपल्याला विचार देखील करायला लावतो. सध्या दोन बैलांनी लॅम्बोर्गिनी गाडीचा चक्काचूर केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रस्त्यावर उभी असणाऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची दोन बैलांनी वाट लावली आहे. बैलांनी गाडीचा चक्काचूर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, मात्र यह व्हिडिओ कुठला आहे ही अजून समजू शकलेले नाही.
सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
दोन बैलांनी लॅम्बोर्गिनी वाट लावली आहे. हा व्हिडिओ @KarishmaAziz_ पोस्ट करण्यात आला आहे. एक महागडी अशी लॅम्बोर्गिनी गाडी रस्त्यात उभी होती. या व्हिडिओमध्ये दोन शक्तीशाली बैल धावत आले आणि त्यांनी लॅम्बोर्गिनी गाडीचे नुकसान केले, असे दिसून येत आहे. एक बैल या गाडीवर उडी मरतो आणि या गाडीची काच, बोनेट तुटले आहे.
इस देश में महँगी कार रोड देख कर नहीं गौ माता और सांड पिता की आबादी देख कर लीजिये। pic.twitter.com/ccBM2T1xBK — Karishma Aziz (@KarishmaAziz_) October 7, 2025
हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर हा खरा असल्यासारखे वाटते. मात्र हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.