उन्हाळ्याची उष्णता सापालाही सोसवेना; फ्रिज उघडताच असे काही दिसले की... पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात कधी मजेदार जुगाड तर कधी धक्कादायक अपघात. यासोबतच इथे प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यातील दृश्ये पाहणे मनोरंजक ठरते. लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडते. आताही इथे एका सापाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे, अशात यात सर्वचजण हैराण झाले आहे. तुम्हाला माहिती आहे का? उन्हाने फक्त माणसचं नाही तर प्राणीही हैराण झाले आहेत. उन्हाळ्यापासून आपला बचाव करण्यासाठी सापाने असा काही पर्याय निवडला की पाहून सर्वांनाच धक्का बसला. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
बंद खोलीत मुलांनी सुरु केला मृत्यूचा खेळ! दृश्य पाहून वाटेल… घेतील थेट यमराजांचीच भेट; Video Viral
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक साप उन्हाने इतका हैराण झाला की तो थेट फ्रिजमध्येच जाऊन बसला. व्हिडिओत साप पाण्याच्या बाटल्यांवर त्याचा फणा पसरून आराम करत असल्याचे दिसून आले. कुटुंबातील एका व्यक्तीने फ्रिज उघडला आणि मग हे प्रकरण उघड झाले. सुरुवातीला कोणालाही समजले नाही की ते खरे आहे की खोटं. पण जेव्हा सापाने थोडीशी हालचाल केली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेवरून असे दिसून येते की उष्णता केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास देत आहे. अशा थंड जागेचा शोध घेणे ही सापाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते रेफ्रिजरेटरच्या दरवाजाच्या सीलिंगमधून आत आले आणि आत गेले. तज्ञांच्या मते, अनेक वेळा सापांसारखे सरपटणारे प्राणी त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थंड ठिकाणं शोधतात. म्हणूनच ते सावलीत, खड्ड्यात, पाण्यात किंवा आता पाहिल्याप्रमाणे, रेफ्रिजरेटरमध्ये देखील जाऊ शकतात.
सापाचा हा व्हायरल व्हिडिओ @_whatsinthenews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘माणसाने फ्रिज उघडताच आत साप थंडाव्याचा आनंद घेताना आढळला’ असे लिहिले आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “उष्णताही एवढी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता तरं फ्रिज उघडायलाही भीती वाटेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.