(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात, कधी हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देतात. आताही इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. व्हिडिओत मुलांनी असा काही पराक्रम करून दाखवला की पाहून सर्वांचेच होश उडाले. यातील थरारक दृश्ये सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. नक्की यात काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भयानक Photo Viral; जिकडे तिकडे मृतांचा सडा अन् काय आहे मूळ सत्य?
काय आहे व्हिडिओत?
सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात काही मुलं मृत्यूचा खेळ खेळताना दिसून आली. व्हिडिओमध्ये काही मुले एका बंद खोलीत काहीतरी खुरापती करत असल्याचे दिसून येते. सगळ्यात आधी ही मुलं ते जमिनीवर पेट्रोल शिंपडतात आणि आग लावतात, हळूहळू आग खोलीत ठेवलेल्या फुटबॉलला लागते. फुटबॉलला आग लागल्यानंतर मुलं त्याच्याशी खेळू लागतात. त्याचवेळी, काही लोक खोलीत फटाके जाळतानाही दिसून येतात. फटाके जाळल्यामुळे मुले इकडे तिकडे उड्या मारू लागतात. विशेष म्हणजे, ही मुलं यावेळी घाबरत नाही तर मुलं यात आनंद लुटताना दिसून येतात. मजा कमी पडू नये म्हणून, मुलांनी अक्षरशः संपूर्ण खोलीभर फटाके उडवले आणि नंतर यापासून पळत पळत स्वतःचा जीव वाचवू लागले. मुलांनी जरी या धोकादायक खेळाची मजा लुटली असली तरी सोशल मीडिया युजर्स मात्र हे सर्व पाहून आवाक् झाले आहेत.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @sarcamax नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मृत्यूचा खेळ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हे काय करत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “धोक्यांचा खेळाडू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.