स्वतःच्याच जाळ्यात अडकला अवकाशाचा राक्षस; सापाने असा गळा आवळला की... पाहून सर्वांचाच उडाला थरकाप; Video Viral
जंगलाचे विश्व आपल्या आयुष्यापासून बरेच वेगळे आणि काळापल्याड आहे. इथे कधी कुणाची शिकार होईल आणि जीव जाईल याची शाश्वती नाही. एकाला जगायचं असेल तर दुसऱ्याचा मृत्यू होणे हे इथले अटळ सत्य आहे. जंगलात शिकरीचे अनेक थरार दररोज घडून येत असतात आणि यातील काही थरारक आणि मजेदार शिकारीचे दृश्य बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि आताही असेच एक दृश्य आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे ज्यात शिकारी स्वतःच शिकार झालयाचे दिसून आले आहे. अन्नसाखळीप्रमाणे गरुड सापाची शिकार करतो हे आपण शिकलो आहोत पण हा व्हिडिओ संपूर्ण अन्नसाखळीला आता चुकीचा ठरवत आहे कारण यात एका गरुडाने नाही सापानेच गरुडाची शिकार केल्याचे दिसून आले आहे. क्षणात पळटलेला हे दृश्य आपल्या अनेक गोष्टी दाखवून जातो. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
अवकाशाचा राक्षस म्हणून गरुडाची ओळख आहे. आपल्या वेगाने तो अवकाशातीलच काय तर जंगलातील प्राण्यांचीही शिकार करायला मागे पुढे बघत नाही. अशात गरुडाची ही दुर्दैवी शिकार आणि क्षणातच पळटलेला शिकारीचा हा खेळ आता अनेकांना थक्क करून जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात गरुडाने सापावर हल्ला करून तो त्याची शिकार करत असल्याचे दिसते पण पुढच्याच क्षणी हे दृश्य बदलते आणि आपल्या युक्तीचा वापर करत साप गरुडाची डाव त्याच्यावरच उलटवतो.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात साप आपल्या शरीराचा फायदा घेत गरुडाच्या शरीराभोवती विळखा घालतो आणि आपल्या शेपटीने थेट त्याचा गळा आवळतो. अडचणीच्या वेळीही, साप पूर्ण धैर्याने आणि संयमाने काम करतो आणि गरुडाला हरवू लागतो. हळूहळू साप त्याला इतके घट्ट पकडतो की गरुड संघर्ष करू लागतो. गरुड उडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला सापाच्या विळख्यातून बाहेर पडत येत नाही आणि इथेच त्याचा शेवट होता. शिकारीचे हे अनोखे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच वाय्राल होत असून आपल्या युक्तीने आपण शक्तीवर कशी मात करू शकतो हे यातून आपल्याला समजते.
What lesson did you learn from this? pic.twitter.com/czLfwTPO6h — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 20, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सापाच्या डोक्याला थेट चावायला हवे होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणून अन्नाशी कधीच जास्त खेळू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बाजी कधीही पलटू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.