येडा बनून खाल्ला पेडा! सापाने हल्ला चढवला पण चिमुकल्या माशाने असा केला पलटवार, नाचत नाचत गेला पाण्यात; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ अनेकदा लोकांना थक्क करून जातात. प्राण्यांच्या शिकारीचे थरार सोशल मीडियावर अनेकदा शेअर झाले आहेत आणि लोकांनी ते पसंतही केले आहेत. आताही इथे अशाच एका अनोख्या शिकारीचा थरार व्हायरल झाला आहे मात्र यात शिकाऱ्याची हार झाल्याचे स्पष्ट दिसून येते. वास्तविक, एक विषारी साप माशाला पाहताच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरा पण यात शेवट त्याचीच हार होते आणि मासा त्याला वेडा बनवून तेथून पळून जातो. आता यात नक्की काय काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सापाने माशा खाण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. पण माशाने आपल्या चपळाईने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याचा पराभव केला. व्हिडिओमध्ये साप मासे पकडण्याचा प्रयत्न करतो, मात्र मासा पटकन तेथून पळ काढतो आणि क्षणार्धातच पाण्यात उडी मारतो. सापासारखा शिकाऱ्याला एका माशाने दिलेली ही मात पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सापाला माशांना आपले भक्ष्य बनवायचे होते, पण माशाने हार मानली नाही. सापाने चपळाईने हल्ला केला, पण माशाने आपली चपळता दाखवली आणि पाण्यात उडी मारली, तिथे साप त्याला इजा करू शकला नाही. हे पाहून सापाने मासे वाचवायचे ठरवले असे वाटले, तरी माशाच्या बुद्धीने तो वाचवला हे सत्य आहे. साप अयशस्वीपणे पाण्यात परतला आणि मासा जिवंत सुटला. माशाची ही शक्कल पाहून आता अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे.
How’s about this? A snake rescues a fish instead of eating it! pic.twitter.com/sKYf5Tu5Ek
— Elena Moon (@elenamoonly) October 4, 2024
साप आणि माशातील हा थरार @elenamoonly नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सापाने नक्कीच माशाला खाण्याचा प्रयत्न केला पण त्या माशाची त्वचा गुळगुळीत होती ज्यामुळे त्याला माशाला पकडता आले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने बहुदा पुढच्या जेवणासाठी त्याला सोडून दिले असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.