(फोटो सौजन्य: instagram)
महाकुंभचा पवित्र सोहळा मागील महिन्यापासून प्रयागराजमध्ये पार पडत आहे. आज याचा शेवटचा दिवस… या मेळाव्याला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मेळावा मानले जाते. यासाठी जगभरातून लोक प्रयागराजला भेट देतात आणि गंगेत स्नान करून पवित्र होतात. अशातच आता या मेळाव्यातील अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आताही इंटरनेटवर येथील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, मुख्य म्हणजे यातील दृश्ये इतकी धक्कादायक आहेत की ती पाहता आता लोकांना त्यावर विश्वासच बसत नाहीये. यातील पत्नीचा पराक्रम पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाकुंभमेळ्यातून हा व्हिडिओ आहे ज्यात ती गंगा नदीच्या काठावर उभी असल्याचे दिसते. हजारो लोक इथे स्नान करण्यासाठी येत असतात. पण आपल्या नवऱ्याला इथे येता आले नाही म्हणून या महिलेने एक अनोखीच शक्कल लढवली आणि आपला मोबाईल फोन पाण्यात बुडवू लागली. हा सर्व प्रकार पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. नक्की यात घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले तर तुम्हाला यात दिसेल की, महाकुंभमेळ्यात आलेली एक पत्नी तिच्या नवऱ्याला व्हिडीओ व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्याच्याबरोबर बोलताना दिसते. इथपर्यंत सर्व ठीक आहे मात्र पुढच्याच क्षणी ती नदीपात्रात उतरते आणिनवऱ्याला कुंभस्नान करता यावे, यासाठी ती आपला फोन पाच वेळा पाण्यात बुडवते. तिचा हा सर्व प्रकार अनेकांना धक्का देणारा असून लोक आता महिलेला छोटी गोपी बहू म्हणून तिची थट्टा उडवत आहे.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @the.sarcastic.house नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने यात लिहिले आहे, “गोपी बहू अल्ट्रा प्रो मॅक्स” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता फक्त हेच बघणे बाकी होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती स्त्री आहे, ती काहीही करू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.