(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवेगळ्या प्रक्रारचे व्हिडिओ शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात, कधी हसवतात तर कधी भावून करतात. आताही इथे एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हला तुमच्या मित्रांची आठवण येईल. सध्या मैत्रीवर आधारित एका मित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरुणाने आपल्या मित्राची दुचाकी जाळल्याचे दिसून येत आहे. ही बाब मित्राला कळवताच त्याचा मित्र त्याला असे उत्तर देतो की ते ऐकून सर्वच थक्क होतात. आता यात नक्की काय घडलं आणि मित्राने नक्की काय उत्तर दिलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक स्कूटर जळत असल्याचे दिसत आहे. यावेळी ही स्कुटर अक्षरशः जळून खाक होत असते. हे संपूर्ण दृश्य रस्त्यावर घडत असते ज्यामुळे दुरूनच लोक हा नजारा आश्चर्यकारक नजरेने पाहू लागतात. यावेळी एक व्यक्ती स्कूटर चालवणाऱ्या माणसाच्या विम्याबद्दल विचारणा करतो ज्यावर तो ही स्कुटर आपल्या मित्राची असल्याचे सांगतो. हे ऐकताच समोरील व्यक्ती जरा थक्क होतो आणि आता मित्र काय करेल अशी विचारणा करतो मात्र यावर मित्राचे जे उत्तर त्याला मिळते ते ऐकून त्याला धक्काच बसतो.
तो म्हणतो, ही स्कुटर माझ्या मित्राची आहे. आपल्या मित्राची स्कूटर जळाल्याचे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला. यानंतर त्याने विचारले की तू तुझ्या मित्राला काय सांगशील, तर तो माणूस म्हणतो की तो काही बोलणार नाही, तो मित्र आहेत, तो काय बोलणार? यानंतर, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्याला विचारले की त्याने आपल्या मित्राला सांगितले का? यावर तो हो असे उत्तर देतो. मग व्यक्ती विचारतो की, मित्र तुला काय म्हणाला यावर व्यक्ती म्हणतो, तो म्हणाला की, ‘जळू दे.’ मित्राचे हे उत्तर ऐकताच व्यक्ती थक्क होतो कारण लाखोंची आपली कार जळूनही मित्र काहीच बोलत नाही जे त्याच्यासाठी धक्कादायक असते.
Bhaichara on the top bhai pic.twitter.com/l6anlYF2kg
— Vishal (@VishalMalvi_) February 25, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरूनस शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाईचारा ऑन टॉप भाई’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कंमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मित्र असावा तर असा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण त्याच्या डोळ्यात दुःख दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.