पापा की परी नव्हे ही तर नाग परी...! सापलाही लागली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहण्याची सवय; मजेदार Video Viral
आपण सर्वांनी लहानपणी ‘तारक मेहता के उल्टा चश्मा’ ही काॅमेडी सिरीयल कधी ना कधी नक्कीच पाहिली असेल. १० वर्षांहून अधिक काळ छोट्या गाजणाऱ्या या सिरीयलने आजवर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशातच आता याचा आणखीन एक चाहता नुकताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, हा चाहता कोणी माणव नसून तर एक नाग आहे. होय, जंगलातल्या विषारी प्राण्यालाही ही सिरीयल इतकी आवडली की त्याला आपली नजरही यावरुन हटवता आली नाही. आश्चर्यचकित पण क्षणात हसू आणणाऱ्या या व्हिडिओने आता सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. चला तर मग यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन मुली बेडवर बसून आरामात त्यांच्या मोबाईलवर “तारक मेहता का उल्टा चष्मा” पाहताना पाहू शकता, ज्यामध्ये तारक मेहता आणि जेठालाल एकमेकांशी फोनवर संवाद साधताना दिसून येत आहेत. दरम्यान, बेडवर मालिकेचा आणखीन एक चाहता बसलेला दिसून येतो. हा चाहता एक नाग असून तो आपला फणा पसरुन, फोनमध्ये सुरु असलेली ही सिरीयल मोठ्या आनंदाने आणि टकामका पाहत असतो. त्याची नजर स्क्रीनसमोर अशाप्रकारे खिळलेली असते की काही केल्या ही नजर तिथून हटवतच नाही. सापाला असं सिरीयल पाहताना बघून आता लोक मात्र चांगलीच थक्क झाली आहेत. सापाचे हे सिरीयलप्रेम पाहून आता यूजर्स चांगलेच आश्चर्यचकीत झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @dimple_vaishnav79_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला दुरून पाहायला सांगा नाहीतर त्याचे डोळे खराब होतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मलाही वाटतं की सापाचे भविष्य खराब होणार आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नागिन शो चालू आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.