Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सोनचाफा ज्वेलर्सने आपल्या अनोख्या जाहिरात संकल्पनेतून सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान दिले आहे. गोरेपणा, नितळ त्वचा आणि ठरावीक चेहऱ्याच्या सौंदर्याला महत्त्व देण्याऐवजी महिलेचे नैसर्गिक रूप, चेहऱ्यावरील डाग आणि आत्मविश्वास अधोरेखित केला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 07, 2026 | 09:54 PM
Beauty Standards in Advertising ( जाहिरातींमधील सौंदर्याचे निकष )

Beauty Standards in Advertising ( जाहिरातींमधील सौंदर्याचे निकष )

Follow Us
Follow Us:
  • सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना दिलेले आव्हान 
  • नैसर्गिक खुणा या सौंदर्यातील कमतरता नही  
  • सोनचाफा ज्वेलर्सची ही संकल्पना एक सकारात्मक पाऊल 
 

Sonchafa Jewellers Viral Advertisement :  आजच्या जाहिरातविश्वात सौंदर्याचे ठरावीक निकष असताना सोनचाफा ज्वेलर्सने पारंपरिक चौकट मोडणारी एक वेगळी जाहिरात संकल्पना सादर केली आहे. गोरेपणा, नितळ त्वचा आणि चेहऱ्याचे ठरावीक सौंदर्य दाखवण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत एका महिलेचे नैसर्गिक व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरील डाग आणि सहज हास्य यांना आपल्या जाहिराती मध्ये स्थान दिले आहे. या वेगळ्या दृष्टिकोनामुळे सोनचाफा ज्वेलर्सचे विशेष कौतुक होतेय.

दागिन्यांच्या जाहिरातींमध्ये आपल्याला नेहनी आकर्षक चेहरा, कोमल त्वचा आणि ग्लॅमरस लूकला अधिक महत्त्व दिले जाते. अनेकदा जाहिरातींसाठी कृत्रिम सौंदर्याचा आधार देखील घेतला जातो. मात्र, सोनचाफा ज्वेलर्सने या सगळ्यापेक्षा वेगळा विचार मांडला आहे. चेहऱ्यावरील नैसर्गिक डाग न लपवता आणि कोणताही कृत्रिम देखावा न करता एका महिलेचा आत्मविश्वास आणि तिचे सहज व्यक्तिमत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

सोनचाफा ज्वेलर्सचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विशेष कौतुक…👏💐👇 आजही जाहिरातींच्या दुनियेत गोरेपणा, नितळ त्वचा आणि ठरावीक चेहरामोहरा यांनाच सौंदर्याचे मापदंड मानले जात असताना, सोनचाफा ज्वेलर्सने मात्र या सगळ्या चौकटी मोडण्याचे धाडस दाखवले आहे.. चेहऱ्यावरील नैसर्गिक डाग न लपवता, कोणताही कृत्रिम देखावा न करता, एका स्त्रीचे सहज हास्य, नैसर्गिक व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यांना आपल्या दागिन्यांच्या जाहिरातीत स्थान देणे ही केवळ वेगळी जाहिरात संकल्पना नाही, तर समाजाला दिलेला एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण संदेश आहे.. खरे सौंदर्य गोऱ्या रंगात नसते, ते आत्मविश्वासात असते; चेहऱ्याच्या निर्दोषपणात नसते, तर स्वतःला आहे तसे स्वीकारण्यात असते.. सोनचाफा ज्वेलर्सने केवळ दागिन्यांचे सौंदर्य दाखवले नाही, तर सौंदर्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यावसायिक जाहिरातीतून सामाजिक संवेदनशीलता आणि सकारात्मक विचार मांडण्याची ही भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे.. अशा जाहिरातींची आणि अशा विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे..
पुन्हा एकदा सोनचाफा ज्वेलर्सचे मनापासून अभिनंदन..🙌🏻
#SonchafaJewellers #BeautyBeyondSkinColor — Amita Chate (@advamitachate) November 7, 2026

 सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना दिलेले आव्हान

या जाहिरातीचे वैशिष्ट्य म्हणजे सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना दिलेले आव्हान आहे. खरे सौंदर्य हे केवळ गोऱ्या रंगात किंवा कोमल त्वचेत नसून ते व्यक्तीच्या आत्मविश्वासात आणि स्वतःला आहे तसे स्वीकारण्याच्या वृत्तीत असते, हा महत्त्वपूर्ण विचार या जाहिरातीत मांडला आहे.

नैसर्गिक खुणा या सौंदर्यातील कमतरता नही

चेहऱ्यावरील डाग किंवा त्वचेवरील नैसर्गिक खुणा या सौंदर्यातील कमतरता नसून प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणाचा भाग आहेत. त्यामुळे बाह्यरूपापेक्षा व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाला महत्त्व देण्याचा संदेश या जाहिरातीतून पाहण्यास मिळतो.

सोनचाफा ज्वेलर्सने या जाहिरातीत केवळ दागिन्यांचे आकर्षण दाखवण्यावर भर न देता सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यावसायिक जाहिरातीतून सामाजिक संवेदनश आणि सकारात्मक विचार मांडण्याची ही भूमिका विशेष कौतुकास्पद ठरते आहे.

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’

सोनचाफा ज्वेलर्सची ही संकल्पना एक सकारात्मक पाऊल

आज सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या माध्यमातून सौंदर्याचे ठरावीक निकष सातत्याने समोर येत असताना, प्रत्येकाने स्वतःचे नैसर्गिक रूप स्वीकारावे आणि आत्मविश्वासाने जगावे, असा संदेश देणाऱ्या जाहिरातींची गरज आहे. सोनचाफा ज्वेलर्सची ही संकल्पना त्याच दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

💡

Frequently Asked Questions

  • Que: जाहिरातीचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: सौंदर्याच्या निकषांपेक्षा महिलेचे नैसर्गिक रूप, चेहऱ्यावरील खुणा आणि आत्मविश्वासाला महत्त्व देण्यात आले

  • Que: सोनचाफा ज्वेलर्सने जाहिरातीतून कोणता संदेश ?

    Ans: सौंदर्य हे गोऱ्या रंगात किंवा नितळ त्वचेत नसून व्यक्तीच्या आत्मविश्वासात आणि स्वतःला स्वीकारण्याच्या वृत्तीत असते.

  • Que: चेहऱ्यावरील डाग सौंदर्यातील कमतरता आहेत का?

    Ans: चेहऱ्यावरील डाग आणि त्वचेवरील नैसर्गिक खुणा या प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणाचा भाग आहेत.

Web Title: Sonchafa jewellers challenges traditional beauty standards advertisement sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • viral
  • viral post
  • viral video

संबंधित बातम्या

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा
1

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…
2

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल
3

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल

Viral Diwali Office Party Video : पिवळ्या साडीतील तरुणीने आपल्या जबरदस्त नृत्याने सर्वांची मने जिंकली
4

Viral Diwali Office Party Video : पिवळ्या साडीतील तरुणीने आपल्या जबरदस्त नृत्याने सर्वांची मने जिंकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.