वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्...; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमध्ये प्रगती तिसरीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी सकाळी शाळेत असताना ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने निर्मान विहार येथील मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. अवघ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने शाळा प्रशासन आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या CCTV फुटेजमध्ये विद्यार्थिनी अचानक हळूहळू खाली झुकताना दिसत आहे. काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळते. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विद्यार्थिनी नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली आणि तिच्या मृत्यूमागील कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 9:52 वाजता पीसीआरला या घटनेची माहिती देणारा फोन आला. माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमधील ९ वर्षीय विद्यार्थिनीला निर्मान विहार येथील मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात आणण्यात आले असून, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासाचा भाग म्हणून वर्गातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनी अचानक कोसळल्याचे दिसून आले आहे.
9-year-old Indian girl DIES after collapsing in Delhi classroom Police are investigating — the school principal says she suffered a cardiac arrest, the exact cause of death is yet to be established https://t.co/DUU3QSI5Xx — RT (@RT_com) November 4, 2026
या घटनेमागील नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सविस्तर तपास केला जात आहे. विद्यार्थिनीच्या पालकांचे तसेच शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. CCTV फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, ९ वर्षीय विद्यार्थिनीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
“ही अत्यंत दुःखद घटना आहे. विद्यार्थिनीला अचानक कार्डियक अरेस्ट आला. ती वर्गात स्वतःहूनच खाली कोसळली. आम्ही तातडीने तिला रुग्णालयात घेऊन गेलो. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही विद्यार्थिनी खेळून वर्गात परत येत होती.”
— प्राचार्या, लवली हेरिटेज स्कूल
Ans: प्रगती असे या ९ वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून ती माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होती.
Ans: प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी शाळेत चालत असताना अचानक हळूहळू खाली झुकली आणि जमिनीवर कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Ans: दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. CCTV फुटेज तपासण्यासह पालक आणि शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.






