गरबा खेळताना तरूणाचा अभ्यास
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या शारदीय नवरात्रीच्या पवित्र सणाला 3 ऑक्टोबर पासून सुरूवात झालेली आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण जो अश्विन महिन्यात साजरा करण्यात येतो. हा सण नऊ दिवस असतो. यावेळी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये लोक एकत्र येऊन गरबा दांडिया खेळतात. सध्या गरबा दांडियाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायल मिळत आहे.
पण याचा एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूण गरबा खेळताना अभ्यास करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना ‘ज्या मुलांना अभ्यास करायचा असतो ते कुठेही अभ्यास करू शकतात, हे खरे ठरले आहे.’ असे व्हिडीच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
गरबा खेळताना तरूणाचा अभ्यास
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गार्डनमध्ये लोक गरबा खेळण्यासाठी जमले आहेत. अनेकजण छानपैकी तयार होऊन आले आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच गरबा खेळत आहेत. या लोकांमध्ये एक मुलगा दिसत आहे जो ग्रुपमध्ये फक्त गरबा खेळत नाही तर असे काही करत आहे ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक, मुलाच्या हातात एक पुस्तक आहे. मुलगा पुस्तक वाचत असताना गरबा खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
‘Padhne wale bacche kahi bhi padh lete hai’ just got real 😭😭 pic.twitter.com/cieAIqUMmd
— Ankita (@Memeswalimulagi) October 6, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Memeswalimulagi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, CA चा विद्यार्थ्यी दिसतो, नोव्हेंबरमध्ये प्रयत्नाची तयारी सुरू आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘जेव्हा तुमचा जन्म नाचण्यासाठी होतो पण जबरदस्तीने अभ्यास करावा लागतो.’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, अभ्यास थांबू नये. मात्र अशी मुले अभ्यास करूनही नापास होतात.