फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
सोशल मीडिया कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आपल्याला सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे दृश्य आपल्याला पाहायला मिळते जे पाहिल्यावर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या साधु पुरूषाला, साधू स्त्रीला ध्यान करताना पाहिले असेल. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आज वेगळेच दृश्य दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क मांजर ध्यान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओच्या दृश्याने अनेकांना चकित केले आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
मांजर संन्यास घेताना
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोंडस मांजर बौद्ध भिक्षूच्या वेशात दिसत आहे. या मांजराने चष्मा देखील घातला आहे. तसेच मांजराच्या गळ्यात एक माळ आहे. याशिवाय एक बौद्ध भिक्षू त्याला धर्माचे धडे देत आहे. ते मांजर देखील शांतपणे ऐकून घेत आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सची मने जिंकली आहेत. मांजर एकदम शांततेने लक्ष देऊन ऐकताना पाहिल्यावर अनेकजण आश्चर्याच पडलेले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pinkvilla या अकाऊंटवर देखील शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने यावर कमेंट केली आहे की, मांजर हा अत्यंत शांत स्वभावाच प्राणी आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मांजरीने कोंबडीच्या पिल्लांमागे धावणे बंद केले आणि सन्यास घेऊन मनाची शांती मिळवली. आणखी एका युजरने म्हटले आहे की, या मांजरीचे डोळे एकदम चिनी लोकांसारखे दिसत आहेत, चौध्या एका युजरने म्हटले आहे की, मांजर कुंफू पांड्याच्या चित्रपटासाठी तयारी करत आहे. अशा भन्नाट प्रतिक्रीया या व्हिडिओवर आल्या आहेत.