अहो काका कँडी नाय तो अजगर हाय..! तोंडात घेत अशी केली त्याची दशा, पाहून तुम्हालाही किळस येईल; Video Viral
साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याचे विष इतके घातक असते की क्षणातच तो समोरच्या प्राण्याला किंवा व्यक्तीला मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. त्याची ताकद पाहता जंगलातील मोठमोठे प्राणीही त्याला पाहताच उलटे पाय घेऊन त्याच्यापासून दूर पळू लागतात अशात सामान्य माणसांचे त्याच्यासमोर कायच चालू शकते. तुम्हालाही असेच काही वाटत असेल आजचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे मत बदलणार आहात.
काही लोक सापाला अजिबात घाबरत नाहीत. ते खेळण्यांशी खेळतात तसे ते सापांशी खेळतात. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असेच काहीसे दिसून आले, जे फारच धक्कादायक आहे. यातील दृश्ये इतकी भयाण आणि किळसवाणी आहेत की ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. व्हिडिओत एक काका व्यक्ती गळ्यात साप बांधून बसलेले दिसून येतात. इथपर्यंत सर्व ठीक असतं मात्र पुढच्याच क्षणी ते काका सापासोबत असं काही करतात की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडीओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील काका सापाला अजिबात घाबरत नाही. यात साप आपला फणा पसरवतानाही दिसून येतो जे पाहताना फार धोकादायक वाटू लागते. पण मग पुढच्याच क्षणी काका सापाचा फणा पकडतात आणि त्याचे तोंड उघडे करत आपल्या तोंडात टाकतात. यानंतर ते सापाचे तोंड आपल्या तोंडात टाकून चावू लागतात. यानंतर ते ते गळ्याभोवती असलेला सापाचा विळखा काढून त्याला सरळ हवेत उभा करतात आणि त्याचे तोंडातच चावत राहतात. व्हिडिओतील ही संपूर्ण घटना विचित्र असून यातील दृश्ये आता अनेकांना अचंबित करत आहेत.
टेकड्यांवर झोका खेळणं तरुणींना पडलं महागात, क्षणार्धातच घडलं असं… जीवाचा थरकाप उडवणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @memesbysukhraj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे तर यमराजांचे भाऊ आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काका सापांचे इमरान हाश्मी आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्वतः यमराज हे पाहून घाबरला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.