(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर दररोज अनेक मजेदार आणि विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्याला खूप हसवतात, परंतु काहीवेळा आपण काही दृश्ये देखील पाहतो ज्यांना पाहताच आपल्या हृदयाची धडधड वाढू लागते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन मुली डोंगरावर झोका झुलताना दिसत आहेत. हे दृश्य अत्यंत धोकादायक आणि भीतीदायक वाटते कारण याच्या खालीच खोल दरी असते. पाहताच पोटात गोळा आणणारे हे क्षण लगेच दुसऱ्या क्षणी बदलते आणि शेवटी ज्याची भीती तेच घडते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन्ही मुली टेकड्यांवर वर अवकाशात झोका झुलत त्याचा आनंद लुटत आहेत. व्हिडिओतील दृश्यांवरूनच याखाली एक खोल दरी असल्याचे समजते. खोल दरीच्या वर इतक्या उंचावर मुलींना कोणत्याही सुरक्षेशिवाय असे झुलताना पाहून कोणच्याही अंगावर काटा येईल. यावेळी त्या पडतात की काय असेच वाटू लागते आणि मग शेवटी घडतेही काही असेच. पुढच्याच क्षणी अचानक त्यांचा तोल बिघडतो आणि दोघी खाली पडतात. ही घटना एवढ्या वेगाने घडली की झोका देणारी व्यक्तीही हादरली. यानंतर व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पुढे काय घडले ते दाखवले गेले नाही, ज्यामुळे मुलींना पडल्यानंतर काही गंभीर दुखापत झाली का असा प्रश्न निर्माण होतो. डोंगरासारख्या उंच ठिकाणी सुरक्षिततेशिवाय झोका खेळण्याचा निर्णय किती धोकादायक असू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ; पाहूनच डोळे दीपतील; Video Viral
Two women who fell from a swing on a mountaintop#shocking #accident #death #closecall #murder pic.twitter.com/Lw66u0HaYS
— SHOCKINGEEK😱 (@shockingeek) March 14, 2023
व्हिडीओमध्ये स्विंग पडल्यानंतरचे दृश्य दाखवण्यात आले नसले तरी स्विंगखाली काही सुरक्षा घटक जसे की गाद्या किंवा इतर सुरक्षा उपाय बसवले गेले असावेत अशी अपेक्षा आहे. अशा धोकादायक खेळांमध्ये सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलींच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. या घटनेचा व्हिडिओ @shockingeek नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘डोंगराच्या शिखरावर झोक्यावरून दोन महिला पडल्या’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेवटी स्विंग ढकलणारा यशस्वी झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते स्थिर असणे आवश्यक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.