(फोटो सौजन्य: Twitter)
तुम्ही सोशल मीडियावर आजवर अनेक घटना व्हायरल झालेल्या पहिल्या असतील. मात्र आता जी घटना इथे व्हायरल झाली आहे ती तुम्हाला क्षणात हादरवून सोडेल. यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडील आहेत आणि सध्या सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. आम्ही याबाबत तुम्हाला आधीच सतर्क करू इच्छितो कारण यातील दृश्ये इतकी भयाण आहेत की पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उठेल. यात नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा राग आल्याने एका व्यक्तीने तिचे शीर कापले आणि हे कापलेले शीर घेऊन तो गावभर फिरू लागला. या घटनेने आता सर्वच हादरले असून याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. युपीच्या बाराबंकी येथील ही घटना आहे. घटना जरी जुनी असली तरी याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याबाबत तरुणाला अटक देखील करण्यात आली. बहिणीच्या नातेसंबंधामुळे म्हणजेच प्रेमप्रकरणामुळे त्याने तिची हत्या केल्याचे समजत आहे. मुलाचे नाव रियाझ (22) असून बहिणीचे आशिफा (18) असे होते. त्यांच्यात झालेल्या एका वादानंतर उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील फतेहपूर भागातील मिठवारा गावात ही घटना घडली.
टेकड्यांवर झोका खेळणं तरुणींना पडलं महागात, क्षणार्धातच घडलं असं… जीवाचा थरकाप उडवणारा Video Viral
रियाझने कथितपणे आपल्या बहिणीचा धारदार शस्त्राने शिरच्छेद केला आणि हातात डोके घेऊन पोलिस स्टेशनला जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितले. आशिफा अलीकडेच तिचा साथीदार चांद बाबू याच्यासोबत त्याच गावातील रहिवासी पळून गेली होती, असे मिश्रा यांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रियाजचा त्याच्या बहिणीच्या नात्याला विरोध होता आणि या मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. बहिणीच्या नात्याच्या नामंजूरी इतक्या टोकापर्यंत पोहचली की त्याने थेट जिचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला जे फार भीषण आहे.
‘Sar Tan Se Juda’
Horrific video of Riyaz carrying chopped head of his sister because she got into a relationship with a boy from their village.
Location- Barabanki, UPpic.twitter.com/jpbgOgTU0N
— Ankur Singh (@iAnkurSingh) July 21, 2023
एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ; पाहूनच डोळे दीपतील; Video Viral
ही घटना @iAnkurSingh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रियाझ आपल्या बहिणीचे चिरलेले डोके घेऊन जात असल्याचा भयानक व्हिडिओ, तिचे त्यांच्या गावातील एका मुलाशी संबंध होते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला अटक झाली का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कल्पना करा की तो दुसऱ्याच्या बहिणीसोबत काय करू शकतो…भयानक”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.