अरे चाललंय तरी काय? "आज की रात" गाण्यावर विद्यार्थिनीबरोबर शिक्षकाचा अश्लीक डान्स, युजर्स संतापले; Video Viral
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याकडे फार आदर्शाने पाहिले जाते. अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला आपले आई-वडील शिकवू शकत नाही त्या गोष्टी एक शिक्षक शिकवून जातो . शिक्षकांकडे नेहमीच आदराने पाहिले जाते. एवढेच काय तर फार पूर्वीपासून गुरूंना एक विशेष स्थान आणि महत्त्व देण्यात आले आहे. एक शिक्षक आपल्या शिष्याला आयुष्याच्या प्रत्येक पावलांवर आपले ध्येय कसे गाठायचे याची शिकवण देतो अशात शिक्षकानेच आपल्या मर्यादा ओलांडणे त्याला काही शोभत नाही.
गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक ठरणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थिनीबरोबर आयटम सॉंगवर थिरकताना दिसून आला. व्हिडिओमधील दोघांचा डान्स पाहून आता सर्वजण आवाक् होत आहेत आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. व्हिडिओत नक्की काय काय आणि कसे घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात भररस्त्यावरचे काही दृश्य दिसून येत आहेत. यात एक बस बाजूला उभी असून काही मुलींचा घोळखा यात दिसून येत आहेत. याचवेळी तुम्ही पाहाल की सर्वांच्या मधोमध एक शिक्षक आणि त्यांची विद्यार्थिनी सर्वांच्या समोर ‘स्त्री-2’ चित्रपटातील ‘आज की रात मजा हुस्न का…’ या आयटम सॉंगवर थिरकत आहेत. रस्त्याच्या कडेला शाळेच्या गणवेशात ही विद्यार्थिनी अश्लील डान्स करताना दिसते. बेफाम होऊन ते दोघेही यावेळी नाचतात आणि तेथील सर्वजण त्याच्याकडे डोळे उंच करून फक्त बघत बसतात.
https://www.instagram.com/reel/DGMqbfUz9Ed
स्टंट करताना अचानक दलदलीत अडकलं मुलाचं डोकं, मग जे झालं… पाहूनच अंगावर येईल शहारा; Video Viral
शिक्षक विद्यार्थिनीचा हा डान्स @ajirul2252 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्स संतापले असून अनेकांनी कमेंट्स करत आता यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर, ऍक्टिंग येत नसेल पण तुम्हाला किमान लाज तर वाटली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नृत्यासाठी जो काही पुरस्कार असेल तो सरांना द्यायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.