(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी अनेक अंतरंगी गोष्टी इंटरनेटवर करू पाहतात. पण प्रत्येक वेळेला आपण केलेली गोष्ट तशी होईलच असे नाही. अनेकदा आपले पराक्रम आपल्यावरीही उलटू शकतात. लोक करायला जातात एक आणि घडत काही वेगळंच. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुण काहीतरी स्टंट करायला जातो खरा पण हा स्टंट त्याच्यावरच उलटतो आणि तो दुर्घटनेस बळी पडतो.
एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा दलदलीत अडकल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती कालव्याच्या काठावर स्टंट करण्यासाठी ओल्या चिखलावर बॅकफ्लिप करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, बॅकफ्लिपनंतर, त्याचे लँडिंग योग्य आहे, परंतु त्याचे डोके ओल्या मातीत किंवा दलदलीत अडकले आहे, ज्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागतो. त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि तो बराच काळ अडकून राहतो. नंतर त्याचे मित्र त्याला दलदलीतून बाहेर काढतात.
त्याचे डोके दलदलीत अडकले तेव्हा त्याला वेदना फार वेदना होतात आणि तो स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला मदत करण्यास उशीर झाला असता तर तो गंभीर जखमी झाला असता. एक प्रकारे, हा व्हिडिओ लोकांना शिकवतो की स्टंट करणे मजेदार असू शकते, परंतु ते कोणत्याही वेळी धोकादायक देखील असू शकते. कोणताही स्टंट करताना आपल्या जीवाशी विशेष करून जबाबदारी घ्यायला हवी.
हा व्हायरल व्हिडिओ @pefabiodemelo नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” ओमजी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” नसते उद्योग करायला सांगतय कोण?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.