(फोटो सौजन्य: instagram)
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक व्हिडिओज पाहिले असतील. हे असे व्हिडिओ नेहमीच लोकांचे मनोरंज करतात ज्यामुळे ते कमी वेळातच व्हायरल होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात हत्ती आणि गेंडा एकमेकांविरोधात लढताना दिसून आले. हत्ती हा जंगलातील विशाल पण शांत स्वभावाचा प्राणी आहे. मात्र एकदा का कुणी त्याच्या वाटेल गेलं की मग त्याच काही खरं नाही. असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओतही घडल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावर एक रंजक आणि आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हत्ती आणि गेंडा यांच्यातील लढतीशी संबंधित आहे. यामध्ये गेंडा आणि हत्ती यांच्यात भयंकर संघर्ष होतो. गेंडा हत्तीच्या वाटेवर येतो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. गेंड्याला बहुधा हत्ती शांत वाटतो आणि तो येऊन त्याच्या समोर उभा राहतो. मात्र, हत्ती सुरुवातीला शांत राहतो, पण नंतर क्षणार्धात तो गेंड्यावर झेपावतो आणि त्याला मारहाण करू लागतो.
स्टंट करताना अचानक दलदलीत अडकलं मुलाचं डोकं, मग जे झालं… पाहूनच अंगावर येईल शहारा; Video Viral
तुम्हाला दिसेल की जेव्हा एखादा गेंडा हत्तीच्या मार्गात उभा राहतो तेव्हा हत्ती काही काळ शांत राहतो. पण गेंडा त्याच्या मार्गात थांबताच हत्तीला राग येतो. हत्तीने गेंडयाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि त्याला जमिनीवर फेकले आणि नंतर त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने गेंडा हादरला आणि घाबरून पळून गेला. गेंडा हत्तीच्या बळामुळे घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी वेगाने धावतो. एकदा गेंडा पळून गेल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. ही मनोरंजनक लढाई आता सोशल मीडियावर व्हायरल होत असुन हत्ती आणि गेंड्याची ही लढत आता लोक वेगाने शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @mr_lolllo नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वडिलांशी कधी पंगा घेऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गजराजाशी विचारपूर्वक लढावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.