Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक आहे की हैवान? विद्यार्थ्याला खेचत भिंतीवर आपटलं डोकं, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अहमदाबादमधील एका खाजगी शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षक एका मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे, त्यानंतर तो मुलाचे डोके भिंतीवर मारतो. व्हिडिओत शिक्षकाने एकंदरीत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेकजण शिक्षकावर संताप व्यक्त करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2024 | 12:40 PM
शिक्षक आहे की हैवान? विद्यार्थ्याला खेचत भिंतीवर आपटलं डोकं, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

शिक्षक आहे की हैवान? विद्यार्थ्याला खेचत भिंतीवर आपटलं डोकं, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपले मनोरंजन देखील करत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडिओ पाहून आता नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओत एक निर्दयी शिक्षक आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्याला क्रूरतेने भिंतीवर आपटत मारताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदाबादमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका शाळेतील शिक्षकाने एका वर्गातील मुलाला अशा प्रकारे मारहाण केली की एखाद्या कसाईलाही लाज वाटेल. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्यवसायाने खाजगी शिक्षक असलेल्या एका व्यक्तीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

हेदेखील वाचा – Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही… पाहूनच अचंबित व्हाल

व्हिडिओत दिसते की, शिक्षक मुलाला बेंचवरून त्याच्या केसांनी उचलतात आणि नंतर त्याला वर्गात त्याच्या खुर्चीवर ओढतात. या दरम्यान, मुलगा शिक्षकापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु शिक्षक त्याला पकडतात आणि जनावराप्रमाणे दूर घेऊन जातात. यानंतर, शिक्षकाने मुलाची मान धरली आणि त्याचे डोके भिंतीवर आपटले, मूल त्यातून बाहेर येण्याआधी, शिक्षकाने एकामागून एक 11 वेळा त्याच्या गालावर चापट मारली.

ही सर्व घटना वर्गात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन खासगी शाळांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. हा व्हिडिओ कथितरित्या माधव पब्लिक स्कूलचा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शाळेचे ट्रस्टी सचिन प्रजापती यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.

अहमदाबाद की एक प्राईवेट स्कूल का सीसीटीवी वायरल हो रहा हे।
इस टीचर के लिए क्या सजा होनी चाहिए – pic.twitter.com/bYGWya0Ma3

— Gopi Maniar ghanghar (@gopimaniar) October 1, 2024

हेदेखील वाचा – बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

दरम्यान या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @gopimaniar नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अहमदाबादमधील एका खासगी शाळेचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. या शिक्षकाला काय शिक्षा व्हावी? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “किती क्रूर होता हा शिक्षक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावर कारवाई व्हायला हवी”.

Web Title: Teacher dragged a child by his hair and then hit his head on the wall in ahmedabad video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…,
1

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…,

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral
2

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral
3

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral
4

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.