टेक्नलॉजिया! तरुणाने पायात असं तंत्रज्ञान फिट केलं की... दुसऱ्या क्षणीच पाण्यावर धावू लागला; तुमचे होश उडवून देईल हा Viral Video
आताच्या काळात तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. आपण अनेक अशा गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने सत्यात घडताना पाहिल्या आहेत, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार करणार नाही. आताही एक असेच सर्वांना थक्क करणारे तंत्रज्ञान सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे ज्यातील दृश्ये तुमचे होश उडवतील. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, माणूस जमिनीवर चालू शकतो पण पाण्यात किंवा हवेत त्याला चालता येत नाही. परंतु, सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण तंत्रज्ञानाची मदत घेऊन चक्क पाण्यावर चालताना आणि धावताना दिसून आला. हे दृश्य फारच दुर्लभ आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे ज्यामुळे कमी वेळातच ते इंटरनेटवर चर्चित ठरले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं की, एका माणसाने आपल्या पायात एक अनोखं डिव्हाईस सेट केलं आहे. या डिव्हाईसच्या मदतीने तो अलगद पाण्यावर उभा राहतो आणि पाण्यावर चालून दाखवतो. त्याला असं पाण्यावर चालताना पाहून आजूबाजूची लोकंही अवाक् होतात आणि एकटक त्याच्याकडे बघू लागतात. व्हिडिओ काही वेळातच दुसऱ्या सीनकडे शिफ्ट होतो ज्यात दुसरा व्यक्ती आपल्या पायात सेम तंत्रज्ञान फिट करुन पाण्यावर वेगाने धावताना दिसून येतो. स्वप्नवत वाटणारे हे दृश्य खरंच फार सुंदर असून ते कुणालाही हवेहवेसे वाटावे असे आहे. व्हिडिओतील हे दृश्य पाहूनच येत्या काळातील तंत्रज्ञान किती आश्चर्यांनी भरलेले आहे याचा आपण अंदाज लावू शकतो.
हा व्हायरल व्हिडिओ @alilo_golf नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे सुंदर आहे, मलाही याचा अनुभव घ्यायला आवडेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वरुन देव पण हे पाहून घाबरला असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माणवाची प्रगती उच्चांग गाठत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.