रीलसाठी धोकादायक स्टंट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात व्हिडीओला लाईक मिळवण्यासाठी, फेमस होण्यासाठी लोक असे काही करतात की, त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. अनेकदा लोक इतके धोकादायक स्टंट करतात की, असे व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. लोकांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे. सध्या अशाच एक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. तेलंगणा राज्यातील हा व्हिडीओ आहे. एका तरूणाने असे काही केले आहे की, ज्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात एका 20 वर्षांच्या मुलाने रील बनवण्यासाठी धोकादायक स्टंट केला. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी शिवराज नावाच्या या व्यक्तीने कोब्रा हा धोकादायक आणि विषारी साप तोंडात भरला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्या व्यक्तीने कोब्राचे तोंड तोंडात धरले आहे, तर कोब्राचे उर्वरित शरीर लटकलेले आहे. एक व्यक्ती याचा व्हिडीओ बनवत आहे.
रीलसाठी तोंडात कोब्राला घातला
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरूण रस्त्याच्या मधोमध उभा असून त्याने तोंडात साप धरलेला दिसतो. यासोबत तो हात जोडून उभा आहे. एकदा त्याने केसातून हात फिरवला. व्हिडिओच्या शेवटी त्याने थम्ब्स अप दिला. ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास रेड्डी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, या भोळ्या तरुणाने कोब्रा तोंडात धरला होता, जेणेकरून त्याचा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला जाऊ शकतो. नंतर सापाने त्याच्या तोंडात चावा घेतला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील देसाईपेट गावात ही विचित्र घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सापाला तोंडातून काढण्याचा प्रयत्न केला असता सापाने चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शरीरात विष पसरल्याने या तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर अनेक जण त्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
व्हायरल व्हिडीओ
Here is the gullible youngster, who held a cobra in his mouth to get filmed possibly for posting on social media platforms.
He died later as the snake bit him in his mouth. This bizarre incident happened in Desaipet village of #Kamareddy district in #Telangana. #bizarre pic.twitter.com/oNneAoydo8— Srinivas Reddy K (@KSriniReddy) September 6, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर नाराजगी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘लोकांना सोशल मीडियाचे इतके व्यसन लागले आहे की ते जीव देण्यास देखील तयार आहेत.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘मला वाटते की आता लोकांचे काउन्सलिंग केले पाहिजे, अन्यथा सोशल मीडियाच्या प्रसिद्धीच्या मागे लागून अनेकांना आपला जीव गमवावा लागेल.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘देव अशा लोकांना बुद्धी देवो. अन्यथा ही पिढी बरबाद होईल.’